पणजी (गोवा) - काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असून पक्षाची गळती रोखण्यासाठी राज्याचे निवडणूक प्रभारी दिनेश गुंडूराव गोव्यात दाखल झाले आहेत. सर्व आमदारांची बैठक घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक प्रभारींकडून मनधरणी - काँग्रेसचे आमदार भाजपा प्रवेश करणार यापासून आपण पक्षाची राजकीय व संघटनात्मक बांधणी, आगामी अधिवेशनाबद्दल माहिती घेण्यासाठी गोव्यात आल्याचा निवडणूक प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी सांगितलं. गुंडूराव यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावली होती. यावेळी सर्व आमदारांसोबत त्यांनी चर्चा करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्ष नेत्यांचा घुमजाव - निवडणूक प्रभारी गुंडूराव यांनी बोलावलेल्या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो आपल्या समर्थक आमदारांसह उपस्थित होते. त्यांना भाजप प्रवेशाविषयी विचारला असता त्यांनी हसत हसत या अफवा असल्याचे सांगितलं. मात्र मूळ प्रश्नाला बगल देत राज्यात कधीही काहीही घडू शकतं असा इशारा त्यांनी हसत हसत यावेळी दिला.
पक्षात सगळं आलबेल - दरम्यान पक्षात सगळं आलबेल असून कोणताही आमदार फुटणार नसल्याचं किंवा इतर पक्षात जाणार नसल्याचा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितलं. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत पाटकर यांनी पक्षात सगळच आलबेल असल्याचे सांगितले.
गोव्यातील काँग्रेस आमदार फुटीच्या वाटेवर, ज्येष्ठ नेत्यांकडून मनधरणीचा प्रयत्न - Goa Congress Michael Lobo News
पक्षात सगळं आलबेल असून कोणताही आमदार फुटणार नसल्याचं किंवा इतर पक्षात जाणार नसल्याचा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितलं. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत पाटकर यांनी पक्षात सगळच आलबेल असल्याचे सांगितले.