ETV Bharat / bharat

Gita Jayanti 2022 : काय आहे गीता जयंतीचे महत्त्व, शुभ काळ, आणि अर्चना - importance date significance

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही गीता जयंती (Gita Jayanti 2022) म्हणून साजरी (shubh muhurat and puja vidhi) केली जाते. या दिवशी (importance date significance) भगवान श्रीकृष्णाने स्व- मुखातून गीतेची शिकवण दिली, असे मानले जाते.

Gita Jayanti 2022
गीता जयंती
author img

By

Published : Nov 26, 2022, 5:37 PM IST

Updated : Dec 3, 2022, 12:05 PM IST

हिंदू धर्मात श्रीमद भगवदत गीता (Gita Jayanti 2022) हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. पुराणात अशी मान्यता आहे की, गीता ही भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाली आहे. या ग्रंथाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील (importance date significance) एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली (shubh muhurat and puja vidhi) जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गीतेची शिकवण दिली असे मानले जाते.

धर्मज्ञानाचा कोष : समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा मान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे.

जीवनाचा पुरुषार्थ : हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील, काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे.

मोक्षदा एकादशी : गीतेची शिकवण माणसाला वास्तवाची जाणीव करून देऊन त्याला जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करते, म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला हा सण साजरा केला जातो, म्हणून या एकादशीला 'मोक्षदा एकादशी' असे म्हणतात. यावेळी गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी मंगळवार, 03 डिसेंबर, शनिवार रोजी साजरी होणार आहे. गीता जयंतीच्या दिवशी श्रीमद्भगवद्गीतेशिवाय भगवान श्रीकृष्ण आणि वेद व्यास यांचीही पूजा केली जाते.

हा शुभ काळ आहे : हिंदू पंचांगानुसार, गीता जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीला साजरी केली जाते. यावेळी 3 डिसेंबर 2022 रोजी गीता जयंती साजरी केली जाईल. श्रीमद भगवद् गीतेचा हा 5159 वा वर्धापन दिन असेल.

अशी करा पूजा : गीताजयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे लवकर उठून स्नान करुन पुजा करावी. यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमद्भगवद्गीतेची पुजा करावी यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमद् भगवद्गीतेला पाणी, अक्षद, पिवळी फुले, धूप-दीप नैवेद्य इत्यादी अर्पण करा.

गीतेचे महत्त्व समजून घ्या : भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या शिकवणीतून जीवनाचे संपूर्ण सार सांगितले आहे. गीतेमध्ये लिहिलेल्या गोष्टी समजून घेतल्या आणि अंमलात आणल्या तर, आपण अगदी सहजरीत्या आयुष्य जगत असतो.

Last Updated : Dec 3, 2022, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.