ललितपूर (उत्तरप्रदेश) - अलीकडच्या काळात आत्महत्येचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनामुळे माणसांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होतात आणि या क्षणिक रागात काहीतरी कठोर पावले उचलण्याच्या घटना हल्ली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
अशीच एक घटना ही उत्तरप्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील तालाबपुरा परिसरात घडली आहे. येथील 18 वर्षीय मुलीने पिझ्झा न मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
क्षुल्लक कारणावरून घेतला गळफास -
ललितपूर जिल्ह्यातील तालाबपुरा भागात राहणाऱ्या अठरा वर्षीय शिखा सोनी या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिखाच्या आत्महत्येमागे क्षुल्लक कारण असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
पिझ्झा न मिळाल्याने झाली होती नाराज -
शिखाचे वडील मोहनलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखाच्या मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी तीचा वाढदिवस होता. वाढदिवसांच्या दिवशी तिने पिझ्झा मागवण्याचा हट्ट केला होता. मात्र वडीलांनी पिझ्झा मागवण्या पेक्षा काही चांगली वस्तू मागवण्याचे सांगितले. त्यानंतर दोन दिवसात तिच्यासाठी पिझ्झा मागवता आला नाही. दोन दिवसानंतर पिझ्झाच्या विषयावर पुन्हा चर्चा झाली. यावेळी आईने तिला सांगितले की, तुला पिझ्झासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागेल. यावर नाराज झालेल्या शिखा आपल्या खोलीत गेली. त्यानंतर काही काळानी आई तिला पाहण्यासाठी केली असता. ती घरातील खोलीत पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आली.
हेही वाचा - लखीमपूर हिंसाचार घटनेचे रिक्रिएशन, पोलिसांनी मंत्रीपुत्रासह तिघांना नेले घटनास्थळी