ETV Bharat / bharat

Girl dies suffocation in car : लपाछपी खेळणे उठले जिवावर, गाडीत लॉक झाल्याने मुलीचा मृत्यू

बरेलीमध्ये लपाछपी खेळणारी मुलगी तिच्या वडिलांच्या गाडीत लपली. मात्र गाडी लॉक झाली. त्यामुळे गाडीतच गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला.

गाडीत लॉक झाल्याने मुलीचा मृत्यू
गाडीत लॉक झाल्याने मुलीचा मृत्यू
author img

By

Published : May 25, 2023, 7:35 PM IST

बरेली : सुट्टीचे दिवस असल्याने मुलांचे खेळ सुरू असतात. मात्र असाच लपाछपीचा खेळ एका ४ वर्षांच्या मुलीच्या जिवावर बेतला आहे. येथे लपाछपीचा खेळ सुरू असताना ४ वर्षांची निष्पाप मुलगी वडिलांच्या गाडीत लपली. कारमध्ये गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला. तिची शोधाशोध सुरू झाल्यानंतर घरच्यांना ती गाडीत लपल्याची माहिती मिळाली. गाडीचे लॉक काढले. मत्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आतच गुदमरुन तिचा मृत्यू झाला होता.

बरेलीच्या बिशरतगंज पोलीस स्टेशन हद्दीतील भगवंतपूर गावात मंगळवारी संध्याकाळी ४ वर्षांच्या निष्पाप मधुचा जीव गुदरुन गेल्याची दुःखद घटना घडली. भगवंतपूर गावात राहणारे कुंवर सेन हे कंत्राटी काम करतात. कुंवर सेन यांची 4 वर्षांची मुलगी मधू मंगळवारी संध्याकाळी तिच्या वयाच्या मुलांसोबत घराबाहेर लपाछपी खेळत होती. यानंतर ४ वर्षांची छोटी मधू बराच वेळ दिसली नाही. तेव्हा घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. खूप शोधाशोध करूनही मधू कुठेच दिसत नसताना अचानक मधूचे वडील कुंवर सेन यांनी त्यांच्या गाडीचे कव्हर काढले आणि 4 वर्षीय मधूला सीटजवळ उलट्या करत असल्याचे पाहिले. कार आतून लॉक झाल्याचे तिच्या वडिलांच्या लक्षात आले. मुलगी आतमध्ये असल्याचे पाहून वडिलांनी तात्काळ घरातून कारची चावी मागितली व गाडीचे लॉक काढले. घाईघाईने ४ वर्षाच्या निरागस मधूला त्यांनी डॉक्टरांकडे नेले. तेथे डॉक्टरांनी तिला पाहिले. तिची तपासणी केली. मात्र खूप वेळ झाला होता. त्यांनी मुलीला मृत घोषित केले.

लपाछपी खेळत असताना 4 वर्षांची निरागस मधू तिच्या वडिलांच्या गाडीत लपली असावी आणि नंतर आतून सेंट्रल लॉक असल्याने गाडी लॉक झाली असावी. तिला लॉक उघडता आले नसावे. असा मधुच्या कुटुंबीयांचा अंदाज आहे. कारमध्ये गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या अपघाताने कुटुंबीय हादरले. कुटुंबियांचा आक्रोश मात्र या घटनेमुळे कमी होत नव्हता. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

  1. CCTV Footage : ह्रदयद्रावक... पार्किंगमध्ये झोपवलेल्या चिमुरडीला कारने चिरडले, जागीच मृत्यू
  2. Bageshwar Dham Baba Got Y Security : बागेश्वर धाम बाबांना वाय श्रेणीची सुरक्षा बहाल, 8 जवान राहणार तैनात; मध्यप्रदेश सरकारचा आदेश
  3. Satyendr Jain Admitted To DDU : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.