ETV Bharat / bharat

Girl Killed In Birthday Party : बर्थडे पार्टी दरम्यान डोक्याला गोळी लागून चिमुरडीचा मृत्यू

author img

By

Published : Dec 4, 2022, 5:36 PM IST

पार्टीत काही तरुण स्टेजवर चढून बार गर्ल्ससोबत नाचत होते. या दरम्यान गोळीबार करण्यात आला. एक गोळी थेट मुलीच्या डोक्याला लागली. गोळी लागताच मुलीला लगेच दवाखान्यात नेण्यात आले, मात्र वाटेतच मुलीचा मृत्यू झाला. (girl killed in firing during birthday party). (firing during birthday party in Nalanda).

Etv Bharat
Etv Bharat

नालंदा (बिहार) : बिहारच्या नालंदामध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका लहान मुलीला आपला जीव गमवावा लागला (girl killed in firing during birthday party). ही घटना दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजपार गावात घडली आहे. इथे बर्थडे पार्टीत बार गर्ल्सचा डान्स पाहण्यासाठी आलेली 12 वर्षीय मुलगी गोळीबाराची बळी ठरली. गोळी लागल्यानंतर मुलीला उपचारासाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात आणण्यात आले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. तुसी कुमारी असे मृत मुलीचे नाव आहे. (firing during birthday party in Nalanda).

गोळी थेट मुलीच्या डोक्याला लागली : घटनेच्या संदर्भात, मुलीचा भाऊ अजित कुमार यांनी सांगितले की, गावात वाढदिवसाची पार्टी सुरू होती. यावेळी बार गर्ल्सचा डान्सचा कार्यक्रम सुरू होता जो पाहण्यासाठी ती मुलगी गेली होती. पार्टीत काही तरुण स्टेजवर चढून बार गर्ल्ससोबत नाचत होते. या दरम्यान गोळीबार करण्यात आला. एक गोळी थेट मुलीच्या डोक्याला लागली. गोळी लागताच मुलीला लगेच दवाखान्यात नेण्यात आले, मात्र वाटेतच मुलीचा मृत्यू झाला.

पोलिस तपासात गुंतले : दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच दीपनगर पोलिस स्टेशनचे प्रमुख संजय कुमार जयस्वाल घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरु केला आहे. या परिसरात अशा कार्यक्रमाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे पोलीस ठाणे प्रमुखांनी सांगितले. सध्या पोलीस पथकाने मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात पाठवून पुढील कारवाई सुरू केली आहे. "घटनेची नोंद झाली असून पोलिस पथक या प्रकरणाचा तपास करेल आणि लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवेल", असे संजय कुमार जयस्वाल यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.