ETV Bharat / bharat

लुधियानाच्या बुलारा गावा ट्रॅक्टर रॅलीची तयारी, मनदीप कौर खालसा करणार नेतृत्व

येत्या 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. सीमेवर ट्रॅक्टर र‌ॅली काढण्यासाठी पंजाबमध्ये जोरदार तयारी जोरात सुरू आहे. लुधियानामधील गिल मतदारसंघातील बुलारा गावातूनही ट्रॅक्टर परेडची तयारी पूर्ण झाली आहे. मनदीप कौर खालसा या स्वत: ट्रॅक्टर चालवत गावातून निघाणाऱ्या ट्रक्टर र‌ॅलीचे नेतृत्व करणार आहेत.

मनदीप कौर खालसा
मनदीप कौर खालसा
author img

By

Published : Jan 23, 2021, 10:42 PM IST

लुधियाना - केंद्र सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या पार पडल्यानंतर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे येत्या 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. सीमेवर ट्रॅक्टर र‌ॅली काढण्यासाठी पंजाबमध्ये जोरदार तयारी जोरात सुरू आहे. राज्यातील विविध खेड्यातील प्रत्येकजण यासाठी हातभार लावत आहे. लुधियानामधील गिल मतदारसंघातील बुलारा गावातूनही ट्रॅक्टर परेडची तयारी पूर्ण झाली आहे. मनदीप कौर खालसा या स्वत: ट्रॅक्टर चालवत गावातून निघाणाऱ्या ट्रक्टर र‌ॅलीचे नेतृत्व करणार आहेत.

लुधियानाच्या बुलारा गावा ट्रॅक्टर रॅलीची तयारी

आपल्या भावाने ट्रक्टर चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते. हे आंदोलन पक्त शेतकर्‍यांचे नसून सर्वांचेच आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी 26 जानेवरीला दिल्लीतील ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

गावातील अधिकाधिक तरूण आणि वडीलधाऱ्यांना गावातून ट्रॅक्टर परेडसाठी जमविले जात आहे. एक टीम गावातून दिल्लीकडे रवाना होईल, ज्यामध्ये सर्व भागातील लोक सहभागी होतील. उर्वरित राज्यांनी शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महिलांचा आंदोलनात सहभाग -

शेतकरी आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलांनीही सहभाग घेतला आहे. दिल्लीच्या सीमांवर हरियाणा आणि पंजाबमधून शेकडो महिला आल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून त्यांचे पती, पुत्र आणि बांधव आंदोलनात पूर्वीपासूनच सहभागी झाले आहेत. आता त्यांच्या खांद्याला खांदा लावत त्याही या लढ्यात उतरल्या आहेत. आपल्या गावातून या महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या सीमांकडे येत आहेत.

आजीबाई गाडी चालवत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या -

काही दिवसांपूर्वी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या अशाच एका आजींची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली होती. शेतकरी आंदोलनाचा आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी 62 वर्ष वय असलेल्या महिला थेट पटियालावरुन सिंघू बॉर्डरवर पोहचल्या होत्या. पटियाला ते सिंघू बॉर्डर दरम्यानच 231 किमी अंतर आहे. या आजीबाई 230 किमी गाडी चालवत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.