ETV Bharat / bharat

'विरोधक पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडतात' - बिहार विधानसभा निकालावर गिरीराज सिंह यांची प्रतिक्रिया

बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएला बहूमत मिळाले आहे. त्यावर नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्यात येणार, असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले. तसेच विरोधक नेहमी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडतात, असेही ते म्हणाले.

गिरीराज सिंह
गिरीराज सिंह
author img

By

Published : Nov 12, 2020, 10:54 AM IST

नवी दिल्ली - बिहार विधानसभेचा निकाल लागला असून राज्यात एनडीएने जादुई आकडा पार करत 125 जागांवर विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची ईटीव्ही भारतने मुलाखत घेतली. एनडीए राष्ट्रहिताच्या दृष्टीने कार्य करतो. 2000 साली भाजपाने 66 जागा जिंकल्या आणि नितीशजींना 36 जागा मिळाल्या होत्या. तरीही भाजपाने नितीश यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आताही नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची खास मुलाखत

राज्यात ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधक नेहमी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडतात. विरोधी पक्षांना घटनात्मक संस्थांवरही विश्वास नाही. जनतेची दिशाभूल करण्यासाठी या प्रकारच्या अफवा महागठबंधनचे लोक पसरवत आहेत. मात्र, जनतेला सत्य माहित आहे, असे गिरीराज सिंह म्हणाले.

ओवैसी राज्यातील जातीय सलोखा बिघडवतील -

जनतेने महागठबंधनचा पराभव केला आहे. यापूर्वी राजदमध्ये 80 आमदार होते. आता ती संख्या 75 वर आली आहे. या निवडणुकीत जनतेने महाआघाडी नाकारली आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या, ही चिंतेची बाब आहे. ओवैसी विषारी भाषा बोलतात. ते राज्यातील जातीय सलोखा बिघडवतील, असेही सिंह म्हणाले.

संपूर्ण देश भाजपबरोबर -

बिहार निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळाला. भाजपने 74 जागा जिंकल्या. गुजरातमधील आठ जागांवर विधानसभा पोटनिवडणुका घेण्यात आल्या. भाजपने त्याही 8 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशमध्ये 7 जागांवर निवडणूक झाली. तेथीलही 6 जागा भाजपने मिळवल्या. कर्नाटक, तेलंगणाच्या पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारली. संपूर्ण देश भाजपबरोबर आहे, असे सिंह म्हणाले.

हेही वाचा 'तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, तर सत्ता लालूनींच चालवली असती'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.