ETV Bharat / bharat

जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपी 4.1 टक्याने वाढला; आर्थिक वर्ष 22 मध्ये 8.7 टक्के - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय

2021-22 च्या चौथ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था (Indian GDP) 4.1 टक्‍क्‍यांनी वाढली (GDP grows), वार्षिक वाढीचा दर 8.7 टक्‍क्‍यांवर गेला, असे अधिकृत आकडेवारीने मंगळवारी दर्शविले.

Indian GDP
भारताची अर्थव्यवस्था
author img

By

Published : May 31, 2022, 8:12 PM IST

नवी दिल्ली: भारताची अर्थव्यवस्था 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 4.1 टक्‍क्‍यांनी वाढली आहे, तर वार्षिक विकास दर 8.7 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. असे अधिकृत आकडेवारी वरुन दिसत आहे. तथापि, जानेवारी ते मार्च या कालावधीतील वाढ 2021-22 च्या मागील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील 5.4 टक्के पेक्षा कमी आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 2.5 टक्क्यांनी वाढले आहे.

आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये 6.6 टक्क्यांच्या आकुंचनाच्या तुलनेत 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 8.7 टक्क्यांनी विस्तारली आहे. NSO ने आपल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजात 2021-22 मध्ये GDP वाढीचा अंदाज 8.9 टक्के ठेवला होता. 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत चीनने 4.8 टक्के आर्थिक वाढ नोंदवली होती.

हेही वाचा : बिटकॉइनने मार्चनंतरचा सर्वात मोठा नफा; $31,500 पेक्षा जास्त वाढवला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.