ETV Bharat / bharat

ऑर्केस्ट्रा डान्सरवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या - दोघांना ठोकल्या बेड्या

Gang Raped in Mirzapur :मिर्झापूरमध्ये ऑर्केस्ट्रा डान्सरवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेनंतर सबंधित पीडित तरुणीनं दोन तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केलं असून, त्यांची सध्या चौकशी सुरू आहे.

Orchestra Dancer gang-raped in Mirzapur
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 8:10 AM IST

मिर्झापूर : Gang Raped in Mirzapur : लालगंजमध्ये ऑर्केस्ट्रा डान्सरवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. मिर्झापूरच्या हलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केला. तसेच, या घटनेतील हे तरुण दुसरे-तिसरे कुणी नसून ऑर्केस्ट्रा संचालकाचेच दोस्त असल्याचं बोलल जातय. त्यांना आता पोलिसांनी अटक केलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात ऑर्केस्ट्रा संचालकालाही अटक करण्यात आलं आहे.

दारूच्या नशेत येऊन सामूहिक बलात्कार : लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही मुलगी तिच्या मावशीच्या मुलासोबत राहत होती. तिथून ती ऑर्केस्ट्रामध्ये नाच काम करण्यासाठी जात होती. बुधवारी (३ जानेवारी) रात्री ती तिच्या मावशीच्या मुलाच्या घरी होती. यावेळी ऑर्केस्ट्रा संचालकाचा मित्र झंगूर आणि जितेंद्र असे दोघजण आले आणि त्यांनी दारूच्या नशेत येऊन या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेनं लालगंज पोलिसांकडं तक्रार देऊन कारवाईची मागणी केलीय.

अमली पदार्थांचे सेवन : लालगंज सर्कलचे सीओ मंजरी राव यांनी सांगितले की, "हलिया पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारी 14 वर्षांची मुलगी ऑर्केस्ट्रामध्ये काम करते. वडील मुंबईत राहतात. मुलगी मावशीच्या मुलाच्या घरी राहून नाच काम करणयासाठी जायची. ऑर्केस्ट्रा संचालक असलेल्या मावशीच्या मुलानं मित्रांसोबत अमली पदार्थांचे सेवन केले होते. यावेळी मद्यधुंद अवस्थेत त्याचे दोन मित्र झंगूर आणि जितेंद्र यांनी मुलीवर बलात्कार केला. तरुणीच्या तक्रारीवरुन गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात ऑर्केस्ट्रा संचालक मावशीचा मुलगा आणि दोन्ही आरोपींना अटक करून चौकशी करण्यात येत आहे."

हेही वाचा :

1 मुलीचा खून करून पसार झालेल्या बापाला तीन तासात बेड्या, दारूच्या वादातून झालं होतं भांडण

2 जान्हवीनेही सांगितला तिच्या मॉर्फ केलेल्या फोटोचा किस्सा, रश्मिका मंदान्नाचेही केले कौतुक

3 मेहनतीच्या जोरावर दीपिका पदुकोणनं गाठलं यशाचं शिखर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.