मुंबई : बादशाह शाहरुख खाननं G20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंद केलंय. भारतात सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान, शाहरुखनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट एक्स सोशल मीडियावर रिशेअर करून अभिनंदन केलंय.
-
Congratulations to Hon. PM @narendramodi ji for the success of India’s G20 Presidency and for fostering unity between nations for a better future for the people of the world.
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It has brought in a sense of honour and pride into the hearts of every Indian. Sir, under your… https://t.co/x6q4IkNHBN
">Congratulations to Hon. PM @narendramodi ji for the success of India’s G20 Presidency and for fostering unity between nations for a better future for the people of the world.
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 10, 2023
It has brought in a sense of honour and pride into the hearts of every Indian. Sir, under your… https://t.co/x6q4IkNHBNCongratulations to Hon. PM @narendramodi ji for the success of India’s G20 Presidency and for fostering unity between nations for a better future for the people of the world.
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 10, 2023
It has brought in a sense of honour and pride into the hearts of every Indian. Sir, under your… https://t.co/x6q4IkNHBN
देशांमधील ऐक्याला प्रोत्साहन : किंग खाननं त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पंतप्रधानांची पोस्ट शेअर केलीय. यामुळं प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची भावना आणखी वाढलीय. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या यशाबद्दल खाननं जगातील लोकांच्या चांगल्या भविष्यासाठी देशांमधील ऐक्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलंय. यामुळं प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर, अभिमानाची भावना आणखी वाढली आहे. मोदीजी, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही एकात्मतेनं समृद्ध होऊ, असं पोस्ट त्याने केलंय.
G20 नेत्यांच्या शिखर घोषणेवर एकमत : गेल्या वर्षी इंडोनेशियानं G20 चं अध्यक्षपद भूषवलं होतं, तर भारतानंतर ब्राझील अध्यक्षपद भूषवणार आहे. गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी बाली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत भारतानं G20 चं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. ते नोव्हेंबर अखेरपर्यंत कायम राहील. शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी शनिवारी G20 नेत्यांनी परिषदेमध्ये प्रस्ताव स्वीकारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 नेत्यांच्या शिखर घोषणेवर एकमत झाले असल्याचं स्पष्ट केलं होतं. G20 अध्यक्षपदासाठी भारताची थीम 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' होती, ज्याचे संस्कृतमध्ये 'वसुधैव कुटुंबकम' असं भाषांतर केलं जातं. नवी दिल्ली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा पंतप्रधान मोदींनी आज केली.
घोषणापत्राचा स्वीकार - जी-20 संघटनेच्या प्रथेप्रमाणं हे घोषणापत्र पंतप्रधान मोदींंच्याकडं बैठकीमध्ये सोपवण्यात आलं. त्यानंतर या घोषणापत्राचा स्वीकार केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी प्रथेप्रमाणे डेस्कवर हातोडा आपटून केली होती. शिखर परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान म्हणाले की, 21 वे शतक हे संपूर्ण जगाला नवी दिशा देण्याची क्षमता असलेला काळ आहे. “हा असा काळ आहे जेव्हा वर्षानुवर्षे जुनी आव्हाने पेलताना त्यावर नवीन उपाय योजना करण्याची गरज आणि मागणी करतात. अशा परिस्थितीत केवळ तंत्रज्ञानाचा सरसकट अवलंब न करता ही आव्हानं मानवकेंद्रित दृष्टीकोनातून पार करुन पुढे जाण्याची गरज आहे.
हेही वाचा -
- G२० Summit : जी20 परिषदेतील दिग्गजांनी राजघाटवर महात्मा गांधींना वाहिली आदरांजली; महाराष्ट्रातील बापू कुटीची प्रतिमा दिली भेट
- Deluge dampens G20 summit : कोट्यवधी खर्चूनही भारत मंडपमात तुंबलं पाणी, काॅंग्रेसची मोदी सरकारवर खोचक टीका
- G20 session on One Future : पंतप्रधान मोदींकडून जी २० परिषद संपल्याची घोषणा, पुढील अध्यक्षपद 'या' देशाला मिळणार