नवी दिल्ली : जी-20 शिखर परिषदेनिमित्त जगभरातून विविध देशांचे पंतप्रधान, पराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी हजेरी लावणार आहेत. नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भव्य अशा भारत मंडपम बिल्डिंगमध्ये जी २० बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
पाहुण्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या पाककृती आणि विविध चविष्ठ अशा अन्नपदार्थांची व्यवस्था करण्यात येत आहे. जी २० परिषदेत 400 प्रकारचे पदार्थ असणार आहेत. तर 700 हून अधिक शेफ असणार आहेत. अधिक काळजी घेण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. हे सर्व अधिकारी २३ पंचतारांकित हॉटेल आणि भारत मंडपम इमारतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर लक्ष ठेवून आहेत. अन्न तयार करण्यासाठी लागणारे घटक बारकाईने तपासले जात आहेत. स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना काळजी घेण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
-
#WATCH | G 20 in India | Japanese Prime Minister Fumio Kishida arrives in Delhi for the G 20 Summit pic.twitter.com/9q5I0FhwHE
— ANI (@ANI) September 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | G 20 in India | Japanese Prime Minister Fumio Kishida arrives in Delhi for the G 20 Summit pic.twitter.com/9q5I0FhwHE
— ANI (@ANI) September 8, 2023#WATCH | G 20 in India | Japanese Prime Minister Fumio Kishida arrives in Delhi for the G 20 Summit pic.twitter.com/9q5I0FhwHE
— ANI (@ANI) September 8, 2023
शाकाहारी व मासांहारी दोन्ही पदार्थ असणार उपलब्ध- भारत मंडपम इमारतीतच स्वयंपाकघराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांना चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. काही पदार्थ आवर्जून तृणधान्यापासून करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने तृणधान्याच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहेत. विदेशातील पाहुण्यांची आवड लक्षात घेऊन शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ उपलब्ध असणार आहेत. जगभरात प्रसिद्ध असलेले सॅल्मन फिश आणि ऑक्टोपस जपानहून आणण्यात आले आहेत.
-
#WATCH | G 20 in India | South African President Cyril Ramaphosa arrives in Delhi for the G 20 Summit.
— ANI (@ANI) September 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He was received by MoS for State for Railways, Coal and Mines, Raosaheb Patil Danve. pic.twitter.com/3OKiXtJVhi
">#WATCH | G 20 in India | South African President Cyril Ramaphosa arrives in Delhi for the G 20 Summit.
— ANI (@ANI) September 8, 2023
He was received by MoS for State for Railways, Coal and Mines, Raosaheb Patil Danve. pic.twitter.com/3OKiXtJVhi#WATCH | G 20 in India | South African President Cyril Ramaphosa arrives in Delhi for the G 20 Summit.
— ANI (@ANI) September 8, 2023
He was received by MoS for State for Railways, Coal and Mines, Raosaheb Patil Danve. pic.twitter.com/3OKiXtJVhi
जी 20 शिखर परिषदेसाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, ओमानचे पंतप्रधान आणि सुलतान हैथम बिन तारिक अल सैद, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आदी आंतरराष्ट्रीय नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
मनोरंजनासाठी 78 संगीतकार उपस्थित राहणार- भारत मंडपम येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी 78 संगीतकार उपस्थित राहणार आहेत. संगीताच्या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत गायनाबरोबर हिंदुस्थानी, कर्नाटक आणि लोकसंगीतातील वादनांचा समावेश असणार आहे. तर वाद्यांमध्ये रुद्र वीणा, सरस्वती वीणा, विचित्र वीणा, जलतरंग, नलतरंग, सूरबहार आदी वाद्ये असतील. भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतिक मानले जाणाऱ्या 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' या गाण्याचे सादरीकरणदेखील होणार आहे. G20 चे खास थीम सॉंग करण्यात आलेले आहे. देशातील जवळपास सर्व राज्यांमधील हस्तकला आणि कला उद्योगांची उत्पादने प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यातून कारागिरांच्या व्यासपीठ मिळेल व त्यांना कलात्मक कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.
-
#WATCH | G 20 in India | UN Secretary-General António Guterres arrives in Delhi for the G 20 Summit. pic.twitter.com/PsPP76fVv5
— ANI (@ANI) September 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | G 20 in India | UN Secretary-General António Guterres arrives in Delhi for the G 20 Summit. pic.twitter.com/PsPP76fVv5
— ANI (@ANI) September 8, 2023#WATCH | G 20 in India | UN Secretary-General António Guterres arrives in Delhi for the G 20 Summit. pic.twitter.com/PsPP76fVv5
— ANI (@ANI) September 8, 2023
हेही वाचा-