ETV Bharat / bharat

#modimadedisaster : कोरोना मृत्यूच्या आकेडवारीवरून राहुल गांधींची मोदींवर टीका - राहुल गांधींचे टि्वट

गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज 2 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.  हे देशातील अनियंत्रित कोरोनाचे जिवंत चित्र आहे. रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या विदारक परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Apr 17, 2021, 4:33 PM IST

नवी दिल्ली - देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज 2 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. हे देशातील अनियंत्रित कोरोनाचे जिवंत चित्र आहे. रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या विदारक परिस्थितीवरून आणि मृत्यूवरून पंतप्रधान मोदींवर हल्ला केला आहे.

Funeral and burial ground, it's Modi made disaster: Rahul
राहुल गांधींचे टि्वट

‘शमशान और कब्रिस्तान दोनों… जो कहा सो किया’, असे टिवट राहुल गांधींनी केले. तसेच त्यांनी #modimadedisaster हा हॅशटॅगही वापरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कोरोनाचा वाढता संसर्ग, लसीचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

हेही वाचा -
कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; 2 हजार 167 साधूंना कोरोनाची लागण

कोरोनाचा प्रसार होऊन एक वर्ष उलटले -

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जनता कर्फ्यूच्या टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या सांगितल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी आत्मविश्वास येईल आणि कोरोना विरोधातील लढाईला बळकटी मिळेल, असा त्यांचा उद्देश होता. कोरोनाचा प्रसार होऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र, अद्याप कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. रुग्णांची संख्या वाढल्याने लसीचा तुडवडा निर्माण झाला.

#modimadedisaster

: कोरोना मृत्यूच्या आकेडवारीवरून राहुल गांधींची मोदींवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.