इंफाळ : मणिपूरमधील इंफाळाच्या पश्चिम जिल्ह्यात नवा हिंसाचार उसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे किमान दोन घरांना आग लागल्याची घटना घडली आहे. जाळपोळीच्या घटनेनंतर गोळ्या चालवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवार ते गुरुवारी मध्यरात्री दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटसोई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू किथेलमांबी येथे रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
सध्या परिस्थिती नियंत्रणात : सुरक्षा दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, या घटनेनंतर परिसरात जमलेल्या मेईती महिलांच्या गर्दीला सुरक्षा दलांनी पुढे जाण्यापासून रोखलं. अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे.
अनुसूचित जमातीच्या दर्जासाठी निदर्शनं : 3 मे रोजी, मणिपूरमध्ये जातीय संघर्ष झाला होता. मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी काही जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित करण्यात आला. या हिंसाचारात आतापर्यंत 180 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात शेकडो लोक जखमी झाले होते. मणिपूरची सुमारे 53 टक्के लोकसंख्या मेतेई समुदायाशी निगडीत आहे. हा समुदाय इम्फाळ खोऱ्यात राहतो. आदिवासी समुदाय- नागा आणि कुकी समुदायापेक्षा 40 टक्के अधिक आहे.
हिंसक निदर्शनं : मणिपूरमध्ये 150 दिवस उलटूनही हिंसाचार थांबलेला नाही. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळं मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार झाला होता. राजधानी इंफाळमध्ये त्यामुळं हिंसक निदर्शनं करण्यात आली होती. मेतेई आणि कुकी समुदायांमधील तेढ कमी होताना सध्या दिसत नाही. सरकारनं केलेलं शांततेचं आवाहनही फोल ठरत आहे.
हेही वाचा -