ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : संगीतालाच शस्त्र बनविणारे स्वातंत्र्य सेनानी रामसिंह ठाकूर, वाचा सविस्तर...

कॅप्टन रामसिंह यांचा जन्म 15 ऑगस्ट 1914 मध्ये झाला. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी ते गोरखा रायफल्समध्ये भर्ती झाले. ऑगस्ट 1941 मध्ये, त्यांना दुसऱ्या महायुद्धात मलय आणि सिंगापूरला लढण्यासाठी पाठवण्यात आले. तिथे जपानी सैन्यांनी त्यांना युद्धकैदी बनविले. 1942 मध्ये सुटल्यानंतर ठाकूर राम सिंह सुभाषचंद्र बोस यांच्या संपर्कात आले. सुभाषचंद्र बोस त्यांच्यावर इतके प्रभावित झाले, की त्यांनी राम सिंह यांना त्यांचे आवडते व्हायोलिन भेट दिले.

स्वातंत्र्याची 75 वर्षे
स्वातंत्र्याची 75 वर्षे
author img

By

Published : Sep 19, 2021, 6:04 AM IST

हिमाचल - भारताच्या अनेक शूर पुत्रांनी वर्षानुवर्षे चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. काहींनी अहिंसेचा मार्ग अवलंबून, तर काहींनी गोळी आणि बंदुकीने हा लढा दिला. मात्र हे गरजेचे नाही की युद्ध नेहमी शस्त्रानेच लढले पाहिजे. भारतातील अशाच एका शूर स्वातंत्र्यसेनानीने आपल्या हातातील शस्त्र सोडत व्हायोलिन हातात घेत संगीतालाच आपले शस्त्र बनविले आणि देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वातंत्र्याचा उत्साह भरला. ते संगीताबरोबरच शस्त्र चालविण्यात सुद्धा पारंगत होते. ते होते कॅप्टन रामसिंह ठाकूर. कॅप्टन रामसिंह ठाकूर यांचा जन्म हिमाचलमधील धर्मशाळा या ठिकाणी झाला.

संगीतालाच शस्त्र बनविणारे स्वातंत्र्य सेनानी रामसिंह ठाकूर

कोण होते रामसिंह ठाकूर?

कॅप्टन रामसिंह यांचा जन्म 15 ऑगस्ट 1914 मध्ये झाला. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी ते गोरखा रायफल्समध्ये भर्ती झाले. ऑगस्ट 1941 मध्ये, त्यांना दुसऱ्या महायुद्धात मलय आणि सिंगापूरला लढण्यासाठी पाठवण्यात आले. तिथे जपानी सैन्यांनी त्यांना युद्धकैदी बनविले. 1942 मध्ये सुटल्यानंतर ठाकूर रामसिंह सुभाषचंद्र बोस यांच्या संपर्कात आले. सुभाषचंद्र बोस त्यांच्यावर इतके प्रभावित झाले, की त्यांनी रामसिंह यांना त्यांचे आवडते व्हायोलिन भेट दिले.

स्वातंत्र्यातील महत्त्वपूर्ण गाण्यांना केले संगीतबद्ध

कॅप्टन रामसिंह यांनी आझाद हिंद सेनेच्या 'कदम कदम बढाएं जा' आणि झाशी राणी रेजिमेंटचे मार्चिंग गीत 'हम भारत की लडकी हैं' हे गाणे संगीतबद्ध केले. नेताजींनी टागोरांची बंगाली कविता 'भारतो भाग्यो बिधाता' यात काही बदल करून अनुवादित केले आणि 'शुभ सुख चैन की बरखा बरसे' हे गीत रचनाबद्ध करुन घेतले. या गाण्यालाही ठाकूर रामसिंह यांनी संगीतबद्ध केले. सर्वात आधी हे संगीत महात्मा गांधी यांच्यासमोर सादर करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शपथविधीला कॅप्टन रामसिंह ठाकूर यांच्या नेत्तृत्वात लाल किल्ल्यावर 'शुभ सुख चैन की बरखा बरसे' हे गाणं सादर करण्यात आले. पुढे याच गाण्याची चाल भारताच्या राष्ट्रगीताची चाल म्हणून वापरण्यात आली. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर, यूपी सरकारने त्यांचा आदर म्हणून त्यांना पोलिसांत पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त केले. 2002 मध्ये त्यांनी लखनौमध्ये अखेरचा श्वास घेतला. मात्र जग सोडण्यापूर्वी ते भारताचे राष्ट्रगीत स्वरबद्ध आणि अजरामर करुन गेले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.