सिंगरोली - मध्यप्रदेशात टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये ४ जण ठार झाले, तर जवळपास १५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सिंगरोली जिल्ह्यात शनिवारी पहाटेच्या २ वाजताच्या सुमारास भल्या टोला या गावाजवळ हा भीषण अपघात घडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
१० अत्यवस्थ-
एका कार्यक्रमावरून लंघाडोल या गावी परतत असताना भल्या टोला या गावाजवळ हा टम्पो आला असता, चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटून अनिंयत्रित झालेला टेम्पो उलटला. या घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर , जवळपास १५ जण गंभीर जखमी झाले. याती १० जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांना उपचारासाठी तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींची अधिकारी लोकप्रतिनिधींनी घेतली भेट-
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर पोलीसही तत्काळ घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. अपघातस्थळी जिल्हाधिकारी राजीव रंजन मीना, पोलीस अधीक्षक विरेंद्र कुमार सिंह आणि देवसारचे आमदार सुभाष रामचरित यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूर केली आहे.