ETV Bharat / bharat

Bihar News: धक्कादायक! नदीत आंघोळ करताना बुडून चार मुलांचा मृत्यू - मुलांचे मृतदेह

आराह येथील सोन नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू झाला. सर्व मुले आंघोळीसाठी सोन नदीच्या घाटावर गेली होती. दरम्यान, चार मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. पाणबुडयांच्या मदतीने चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Bihar News
नदीत आंघोळ करताना बुडून चार मुलांचा मृत्यू
author img

By

Published : Mar 16, 2023, 7:33 AM IST

आराह : बिहारमधील अराहमध्ये मोठी दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. आराह येथे सोन नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू झाला. ही घटना आजीमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहिमंचक सोन बाळू घाट येथील आहे. बुडून मृत्यू झालेली सर्व मुले अजीमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नूरपूर गावातील रहिवासी आहेत. सोन नदीतील अवैध उत्खननात गुंतलेले वाळू माफिया या घटनेचे जबाबदार असल्याचे मृतांचे नातेवाईक सांगत आहेत.

घबराटीचे वातावरण : एकाच गावातील ४ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पसरताच संपूर्ण परिसरात एकच खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुडालेल्या मुलांपैकी दोन चुलत भाऊ असून दोघे शेजारी राहत होते. नूरपूर गावातील रहिवासी वीरेंद्र चौधरी यांचा १२ वर्षांचा मुलगा अमित कुमार, मयत राम राज चौधरी यांचा ८ वर्षांचा मुलगा रोहित कुमार, १० वर्षांचा मुलगा शुभम कुमार अशी मृत मुलांची नावे आहेत. मृत शुभम कुमार आणि रोहित कुमार हे दोघे चुलत भाऊ आहेत.

वाळू माफियांवर होत आहेत आरोप : घटनेची माहिती मिळताच स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आराह येथील रुग्णालयात आणले. सहा मुले आंघोळीसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. बेकायदा वाळू उत्खनन माफियांनी सोन नदीत मोठमोठे खड्डे खोदून हा पूल तयार केल्याचे मृत मुलांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. खेळता खेळता मुले पाण्याने भरलेल्या खड्ड्यात घसरली. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख : फुलहाडी सोन घाट येथे सोन नदीत बुडून 4 मुलांचा मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेचे दु:खद वर्णन केले आहे. दिवंगत आत्म्याला चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखाच्या प्रसंगी धीर सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सर्व मृतांच्या आश्रितांना विलंब न करता प्रत्येकी चार लाख रुपयांची सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हेही वाचा : Satara Crime : जेवताना शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलाने केली पित्याची हत्या, गावच्या यात्रेवर शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.