ETV Bharat / bharat

Padma Award : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मविभूषण पुरस्कार नाकारला

author img

By

Published : Jan 26, 2022, 12:36 AM IST

Updated : Jan 26, 2022, 1:11 AM IST

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मविभूषण पुरस्कार नाकारला आहे. (Refuses Padma Bhushan Awards) मंगळवारी पद्मभूषण पुरस्कारांची घोषणा झाली त्यानंतर भट्टाचार्य यांनी पुरस्काराला नकार कळवला आहे. (Former Bengal CM Buddhadeb Bhattacharya) हा भट्टाचार्य यांच्यासह पक्षाचा निर्णय आहे, असे सीपीआय(एम)ने स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य

मुंबई - पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नरेंद्र मोदी सरकारने त्यांना दिलेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. (Former Bengal CM Buddhadeb Bhattacharya) मंगळवारी पद्मभूषण पुरस्कारांची घोषणा झाली त्यानंतर भट्टाचार्य यांनी पुरस्काराला नकार कळवला आहे. हा भट्टाचार्य यांच्यासह पक्षाचा निर्णय आहे, असे सीपीआय(एम)ने स्पष्ट केले आहे.

तर मी तो नाकारत आहे

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)च्या पॉलिट ब्युरोचे माजी सदस्य, बुद्धदेव भट्टाचार्य हे (२००२ ते २०११)पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 'मला पद्मभूषण पुरस्काराबाबत काहीही माहिती नाही.(Buddhadeb Bhattacharya declined Padma Bhushan Awards) त्याबद्दल मला कोणीही काही सांगितले नाही. (Padma Bhushan Awards 2022)जर त्यांनी मला पद्मभूषण पुरस्कार दिला असेल. तर मी तो नाकारत आहे, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

बुद्धदेव भट्टाचार्य कोण आहेत?

भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. यासोबतच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही राहीले आहेत. (Senior leader of CPI Buddhadeb Bhattacharya (M)) बुद्धदेव भट्टाचार्जी यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला. त्यांचे वडिलोपार्जित घर बांगलादेशात आहे. त्यांनी कोलकाता येथील प्रतिष्ठित प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बंगाली साहित्याचा अभ्यास केला आहे. बंगाली (ऑनर्स) मध्ये बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. नंतर ते सीपीआय(एम) मध्ये सामील झाले.

नंदीग्रामसारख्या आंदोलनांमुळे त्यांना सत्ता गमवावी लागली

बुद्धदेव हे 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ते सलग २४ वर्षे जाधवपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. ते सीपीआय(एम) ची सर्वोच्च धोरण संस्था पॉलिटब्युरोचे सदस्यही आहेत. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयापूर्वी ते बंगालचे मुख्यमंत्री होते. मात्र, सिंगूर, नंदीग्रामसारख्या आंदोलनांमुळे त्यांना सत्ता गमवावी लागली.

पद्मभूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

याशिवाय पद्मभूषणसाठी जाहीर करण्यात आलेल्या १७ नावांपैकी दोघांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे. नेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा समावेश आहे.

हेही वाचा - ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार;ईटीव्ही भारत'चा अत्रेंशी संवाद

Last Updated : Jan 26, 2022, 1:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.