नवी दिल्ली : Sandeep Goyal: आशियातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगाचे माजी डीजी संदीप गोयल यांना निलंबित करण्यात आले sandeep goyal suspended आहे. काल रात्री गृह मंत्रालयाने त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले होते. सुमारे महिनाभरापूर्वी सुकेश चंद्रशेखर प्रकरणात त्यांना तिहार कारागृहाच्या डीजी पदावरून हटवून दिल्ली पोलीस मुख्यालयात जाण्यास सांगण्यात आले होते. त्यावरून येत्या काळात त्यांच्यावर कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जात होती. former tihar jail dg sandeep goyal
सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर पैसे दिल्याचा आरोप केला होता. यासोबतच त्यांनी तिहार तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल यांना 12.5 कोटी रुपये दिल्याचेही सांगितले होते. सुकेश चंद्रशेखर यांनी संदीप गोयल यांना सुविधा आणि सुरक्षा देण्याच्या बदल्यात 12.5 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता.
अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने तुरुंगात बंद दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत अहवाल मागवला होता, हा अहवाल दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून मागवण्यात आला होता. अलीकडेच ईडीने न्यायालयाला सांगितले होते की, सत्येंद्र जैन आपल्या प्रभावाचा वापर करून तुरुंगात सुविधा घेत आहेत. त्यांना सुविधाही दिल्या जात आहेत.
ईडीने न्यायालयाला सांगितले की, तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांना केवळ डोक्याची मसाजच Satyendra Jain Massage Video दिली जात नाही, तर त्यांना वेळोवेळी पायाची मसाज आणि पाठीचा मसाज यांसारख्या सुविधाही दिल्या जात आहेत. याप्रकरणी तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांना शुक्रवारी तेथून हटवण्यात आले.