ETV Bharat / bharat

Chandigarh News : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आज करणार भाजपमध्ये प्रवेश - काँग्रेस पक्ष

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग ( Former Chief Minister of Punjab Amarinder Singh ) आज भारतीय जनता पक्षात ( BJP ) प्रवेश करणार आहेत. यासोबतच अमरिंदर सिंग आपल्या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करणार आहेत. गतवर्षी सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा अचानक राजीनामा देऊन काँग्रेस पक्ष ( Congress party ) सोडला होता.

Former Chief Minister of Punjab Amarinder Singh
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
author img

By

Published : Sep 19, 2022, 10:46 AM IST

चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग ( Former Chief Minister of Punjab Amarinder Singh) आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्षाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की सिंह हे त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पीएलसी पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करतील. अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्ष सोडला आणि पीएलसीची स्थापना केली. आज दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा ( BJP president JP Nadda in Delhi ) आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार आहेत.

पीएलसीचे इतर पदाधिकारी देखील भाजपमध्ये होणार सामील : PLC चे प्रवक्ते प्रीतपाल सिंह बलियावाल यांनी माहिती दिली आहे की, PLC मध्ये सामील झालेले सात माजी आमदार आणि एक माजी खासदार देखील आज भाजपमध्ये सामील होणार आहेत. ते म्हणाले की, पीएलसीचे इतर पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष चंदीगडमध्ये एका वेगळ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर नुकतेच लंडनहून परतलेल्या अमरिंदर सिंग यांनी गेल्या पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा मानस : सिंह यांनी 12 सप्टेंबर रोजी शहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर सांगितले होते की, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर, पंजाबमधील अंमली पदार्थ दहशतवादाची वाढती प्रकरणे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातील रोडमॅपवर त्यांनी अतिशय फलदायी चर्चा केली. भाजपच्या पंजाब युनिटचे नेते हरजित सिंग ग्रेवाल यांनी जुलैमध्ये सांगितले होते की, अमरिंदर सिंग यांनी लंडनला जाण्यापूर्वी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा मानस व्यक्त केला होता. माजी मुख्यमंत्री लंडनहून परतल्यानंतर विलीनीकरणाची घोषणा करतील, असे ग्रेवाल यांनी त्यावेळी सांगितले होते.

पटियाला अर्बन जागेवर पराभव : दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले सिंग हे पूर्वीच्या पटियाला राजघराण्याचे वंशज आहेत. चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पीएलसीने भाजप आणि सुखदेवसिंग धिंडसा यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दल यांच्याशी युती करून विधानसभा निवडणूक लढवली. तथापि, त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही आणि स्वतः सिंग यांचा त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या पटियाला अर्बन जागेवर पराभव झाला.

संध्याकाळी 4.30 वाजता होणार कार्यक्रम : माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह काल संध्याकाळी दिल्लीला रवाना झाले होते. कॅप्टन अमरिंदर सिंग आपला मुलगा, मुलगी आणि काही माजी आमदारांसह दिल्लीला रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंह आज दुपारी 4.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्यासोबत अनेक माजी आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.