ETV Bharat / bharat

कर्नाटक : माजी खासदार जी मेड गौडा यांचे निधन, मांड्यामधील रुग्णालयात सुरू होते उपचार - mandya

कर्नाटकचे माजी खासदार जी मेड गौडा यांचे निधन झाले. ते ९४ वर्षाचे होते.

former mp g made gowda passed away at hospital in mandya karnataka

author img

By

Published : Jul 18, 2021, 2:03 AM IST

मांड्या (कर्नाटक) - कर्नाटकचे माजी खासदार जी मेड गौडा यांचे निधन झाले. ते ९४ वर्षाचे होते. जी मेड गौडा हे फुफ्फसाच्या व्याधीने ग्रस्त होते. यामुळे त्यांच्यावर मांड्या जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जी मेड गौडा यांच्या निधनावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

  • Former MP G Made Gowda passed away at a hospital in Mandya. He was undergoing treatment for lung disease

    Karnataka CM, BS Yediyurappa, in his condolence message, said Gowda imbibed teachings of Gandhi&was in forefront of Cauvery river water sharing distrbution agitations pic.twitter.com/0Ig2T78MUa

    — ANI (@ANI) July 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जी एस मेड गौडा हे महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर चालणारे होते. ते कावेरी नदीच्या पाणी वाटपासंदर्भात झालेल्या आंदोलनात अग्रस्थानी होते. जी मेड गौडा हे मांड्याचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. ते कुरुगावल्लू येथून विधानसभेवर सहा वेळा निवडून गेले होते.

विद्यार्थी दशेत जी मेड गौडा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्याचे सांगितलं जात आहे. या लढ्यादरम्यान, ते कारागृहात देखील गेले होते. मांड्या जिल्ह्यातील गुरूदेवराहल्ली येथे १९२८ साली जन्मलेल्या जी मेड गौडा यांनी म्हैसूरमधील महाराजा कॉलेज आणि बंगळुरू येथील सरकारी लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

जी मेड गौडा १९८९ मध्ये मांड्याचे खासदार बनले. त्यानंतर ते १९९१ साली पुन्हा निवडून आले. याआधी त्यांनी १९८०-१९८३ या दरम्यान, गुंडू सरकारमध्ये वन विभागाचे मंत्री म्हणून काम पहिलं. तामिळनाडूच्या कावेरी नदी पाणी वाटपाच्या लढाईत गौडा यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने लढा लढला. ते कावेरी शेतकरी कल्याण समितीचे प्रमुख देखील राहिले.

परिवारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौडा यांचे पार्थिव त्यांच्या मांड्या येथील राहत्या घरी नेण्यात येणार आहे. येथे लोकांना अंतिम दर्शनासाठी त्याचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान गौडा यांच्या निधनावर राजकीय, शेतकरी संघटना तसेच सर्व स्तरातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.

हेही वाचा - UP पत्नीच्या मारेकऱ्याला ठार केल्यास पती देणार 20 हजार रुपयांचे बक्षीस

हेही वाचा - VIDEO : धगधगत्या आगीत उभे राहून टीडीपी कार्यकर्त्यांचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.