ETV Bharat / bharat

Anand Mohan Released From Jail : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आनंद मोहनची कारागृहातून सुटका - जी कृष्णय्या खून प्रकरणात जन्मठेप

बिहारच्या गोपालगंजचे तत्कालिन जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांच्या खूनप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आनंद मोहन यांची आज सुटका करण्यात आली. आज सकाळी आनंद मोहन सहरसा कारागृहातून बाहेर आले.

Anand Mohan Released From Jail
माजी खासदार आनंद मोहन
author img

By

Published : Apr 27, 2023, 10:08 AM IST

Updated : Apr 27, 2023, 10:59 AM IST

सहरसा : बाहुबली नेता आणि माजी खासदार आनंद मोहन यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. आज सकाळी आनंद मोहन सहरसा कारागृहातून बाहेर आले आहेत. आनंद मोहनच्या सुटकेची वेळ 2 वाजेची असली तरी औपचारिकता पूर्ण करून पहाटेच त्यांची सुटका करण्यात आली. तुरुंग अधीक्षक अमित कुमार यांनी त्यांच्या सुटकेला दुजोरा दिला आहे. 15 दिवसांचा पॅरोल पूर्ण झाल्यानंतर आनंद मोहनने बुधवारी दुपारी 4.20 वाजता सहरसा येथे आत्मसमर्पण केले होते.

आनंद मोहन सहरसा तुरुंगातून बाहेर : नितीश कुमार सरकारने अलीकडेच बिहार कारागृह 2012 च्या नियम 481 (i) मध्ये सुधारणा केली होती. त्यामुळे आनंद मोहनच्या सुटकेतील कायदेशीर अडथळा दूर झाला होता. त्यानंतर सोमवारी माजी खासदार आनंद मोहनसह 27 बंदीवानाच्या सुटकेची अधिसूचनाही जारी करण्यात आली. मुलगा चेतन आनंदच्या लग्नासाठी पॅरोलवर बाहेर असल्याने आनंद मोहन यांना पुन्हा तुरुंगात जाणे आवश्यक होते. त्यामुळे 15 दिवसांचा पॅरोल कालावधी संपल्याने त्यांनी बुधवारी सहरसा कारागृहात आत्मसमर्पण केले.

डीएम जी कृष्णय्या खून प्रकरणात जन्मठेप : गोपालगंजचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांच्या खूनप्रकरणी आनंद मोहनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये 5 डिसेंबर 1994 रोजी जी कृष्णैया यांची हत्या करणाऱ्या जमावाचे नेतृत्व आनंद मोहन करत होते. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र 2008 मध्ये पाटणा उच्च न्यायालयाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली. 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला होता.

आनंद मोहनला 14 वर्षांची शिक्षा : आनंद मोहनला जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांच्या खूनप्रकरणी 14 वर्षांची शिक्षा झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या सुटकेची मागणी होत होती. मात्र, सुटकेच्या आदेशानंतर विरोधही सुरू झाला आहे. दलित संघटना आणि काही राजकीय पक्षही विरोध करत आहेत. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती आणि कृष्णय्या यांच्या कुटुंबीयांनी याला विरोध केला आहे. त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष भाजपही दबक्या आवाजात आक्षेप घेत आहे. विरोधी पक्षनेते विजय सिन्हा आणि राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांसारखे नेते याला विरोध करत आहेत. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, माजी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांच्यासारखे नेते आनंद मोहनला सोडण्याचे समर्थन करत आहेत.

हेही वाचा - Prakash Singh Badal: भाजपला राजकीयदृष्ट्या 'अस्पृश्य' बोलले जात असताना प्रकाशसिंग बादलांनी दिली साथ

Last Updated : Apr 27, 2023, 10:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.