चंदीगढ : पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने ( Punjab Vigilance Bureau ) एका मोठ्या कारवाईत माजी काँग्रेस मंत्री आणि भाजपचे विद्यमान नेते सुंदर शाम अरोरा यांना अटक ( Sundar Sham Arora arrested ) केली आहे. रात्री उशिरा सुंदर शाम अरोरा याला जिरकपूर येथून दक्षता विभागाने अटक केली आहे. दक्षता संचालक वरिंदर कुमार यांनी सांगितले की, माजी मंत्री अरोरा यांनी एआयजी दक्षता मनमोहन कुमार यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. याची माहिती एआयजींनी आम्हाला दिली.
या संदर्भात दक्षता संचालक वरिंदर कुमार सांगतात की, सुंदर शाम अरोरा विरोधात खटला सुरू आहे. या संदर्भात दक्षता अधिकाऱ्याला 1 कोटींची लाच देऊन प्रकरण मागे घेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे दक्षता विभागाने सापळा रचून ५० लाखांचा लाचेचा पहिला हप्ता देताना रंगेहात पकडले. दरम्यान, सुंदर शाम अरोराही पीएसोबत असल्याचे दक्षताने सांगितले. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी दक्षता तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यात त्यांनी लाच देण्याचा प्रयत्न केला. सुंदर शाम अरोरा याला न्यायालयात हजर करून कोठडी सुनावण्यात येणार असल्याचे दक्षताने सांगितले.
सुंदर शाम अरोराविरुद्ध दोन खटले सुरू : सुंदर शाम अरोराविरुद्ध दोन खटले सुरू असल्याचे दक्षता विभागाने सांगितले. एक म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आणि दुसरे सुंदर शाम अरोरा मंत्री असताना झालेले घोटाळे. त्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले. ते म्हणाले की, सध्या सुंदर शाम अरोरा याला लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सुंदर शाम अरोरा हे काँग्रेसच्या कॅप्टन सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. यानंतर पंजाबमध्ये चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. यासोबतच नुकतेच सुंदर शाम अरोरा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.