नवी दिल्ली - शांती भूषण हे ज्येष्ठ वकील होते. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील प्रसिद्ध खटल्यात राजनारायण यांचे प्रतिनिधित्व केले होते, ज्यामुळे 1974 मध्ये इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले. शांती भूषण यांनी जनहिताचे अनेक मुद्दे हाती घेतले होते. तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांचे मोठे काम होते. त्यांनी मोरारजी देसाई सरकारमध्ये 1977 ते 1979 पर्यंत भारताचे कायदा मंत्री म्हणून काम केले होते.
-
Shri Shanti Bhushan Ji will be remembered for his contribution to the legal field and passion towards speaking for the underprivileged. Pained by his passing away. Condolences to his family. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) January 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shri Shanti Bhushan Ji will be remembered for his contribution to the legal field and passion towards speaking for the underprivileged. Pained by his passing away. Condolences to his family. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) January 31, 2023Shri Shanti Bhushan Ji will be remembered for his contribution to the legal field and passion towards speaking for the underprivileged. Pained by his passing away. Condolences to his family. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) January 31, 2023
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त - कायदेशीर क्षेत्रातील योगदान आणि वंचितांसाठी बोलण्याची तळमळ यामुळे शांती भूषण कायम लक्षात राहतील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून बाहेर पडण्याचे बळ मिळो. ओम शांती, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांती भूषण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गाजलेला खटला - शांती भूषण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एका प्रसिद्ध खटल्यात राजनारायण यांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे 1974 मध्ये इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावा लागले. तत्पूर्वी, इंदिरा गांधी 1971 च्या सार्वत्रिक निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आणि पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यावेळेची जनसंघाचे त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टात निवडणुकीत गैरव्यवहार करून आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.
राजकीय प्रवास - शांती भूषण हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एक अतिशय वरिष्ठ वकील होते. २००९ च्या द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या यादीत त्यांचे पुत्र प्रशांत भूषण ७४ व्या स्थानावर होते. शांती भूषण हे काँग्रेस (ओ) आणि नंतर जनता पक्षाचे सदस्य होते. ते राज्यसभेचे खासदारही होते. 1980 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 1986 मध्ये भाजपचा राजीनामा दिला.