ETV Bharat / bharat

Satya Pal Malik summoned by CBI : सत्यपाल मलिक यांना CBI चे समन्स, 28 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले - रिलायन्स जनरल इन्शुरन्समधील कथित भ्रष्टाचाराच्या

सत्यपाल मलिक यांच्या अडचणी अपेक्षेप्रमाणे वाढल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने 28 एप्रिल रोजी साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावले आहे. कथित इन्शुरन्स घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.

Satya Pal Malik summoned by CBI
Satya Pal Malik summoned by CBI
author img

By

Published : Apr 21, 2023, 7:34 PM IST

नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्समधील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने 28 एप्रिल रोजी साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावले आहे. सत्यपाल मलिक यांनी याबाबत वृत्तसंस्थाना माहिती दिली आहे. ते म्हणाले की, काही बाबी स्पष्ट करण्यासाठी त्यांना मध्य दिल्लीतील सीबीआयच्या अकबर रोड येथील अतिथीगृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

मलिक पुढे म्हणाले की, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना काही स्पष्टीकरण हवे आहे. ज्यासाठी त्यांना माझ्याकडून माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे. मी राजस्थानला जात आहे म्हणून मी त्यांना 27 ते 29 एप्रिलपर्यंतच्या तारखा दिल्या आहेत. जेव्हा मी सीबीआयला उपलब्ध होईल. मलिक यांनी पुढे सांगितले की, त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना 2018 मध्ये कंपनीचा करार रद्द केला होता.

या प्रकरणातील प्रथम माहिती अहवालात (FIR), CBI ने ट्रिनिटी रीइन्शुरन्स ब्रोकर्ससह रिलायन्स जनरल इन्शुरन्सला जम्मू आणि काश्मीर सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय विमा योजना आणण्याच्या कथित घोटाळ्यात आरोपी म्हणून नाव दिले आहे. मलिक यांनी विमा योजनेत फसवणुकीचा आरोप केला होता, त्यानंतर सीबीआयची कारवाई झाली.

ही योजना, सुमारे 3.5 लाख कर्मचार्‍यांना सामावून घेणार होती. सप्टेंबर 2018 मध्ये ही योजना आणली गेली आणि मलिक यांनी एका महिन्यात ती रद्द केली. त्यावेळी, मलिक म्हणाले होते की राज्य सरकारी कर्मचार्‍यांना करार रद्द करायचा आहे कारण त्यांना ते फसवे असल्याचे आढळले आणि त्यांनीही तपशील तपासल्यानंतर तोच निष्कर्ष काढला. त्यावेळी मलिक यांनी स्पष्ट केले होते की, मी स्वत: फायलींचा अभ्यास केला आहे. जेव्हा मी निष्कर्षापर्यंत पोहोचलो की करार चुकीच्या पद्धतीने दिला गेला, तेव्हा मी तो रद्द केला.

मलिक यांनी नुकतीच एक मुलाखत देऊन काही आरोप केले होते. त्यानंतर या प्रकारचे समन्स त्यांना काढण्यात आल्याची चर्चा आहे.

Uttarakhand Chardham: चारधाम यात्रा उद्यापासून, आता अमर्याद भाविकांना घेता येणार दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.