पणजी - गोवा काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो यांनी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहाला कंटाळून आमदारकीचा व काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आमदारांनी आत्महत्या न करता वेगळा मार्ग धरावा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार लुझिनो फलेरो यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा सभापतींकडे सुपूर्द केला. 2017 पासून काँग्रेस पक्षात होणारी घुसमटीमुळे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनाम्याचे कारण असल्याचे फलेरो यांनी सांगितले.
हेही वाचा-बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे तिघे राजापूरमध्ये जेरबंद; वनविभागाची कारवाई
२०१७ पासून काँग्रेस पक्षात माझा छळ सुरू- फलेरो
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून आणण्यात फलेरो यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याचवेळी त्यांचे ३ समर्थक आमदारही निवडून आले होते, त्यावेळी आपण दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे दावा करण्याचा आग्रह धरला होता, मात्र काँग्रेसने आपल्याला विरोध करत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हापासून आपला काँग्रेस पक्षात दुय्यम भूमिका देत छळ सुरू झाला. परंतु आपण आजपर्यंत साडेचार वर्षे निमुटपणे सगळे सहन केले. मात्र, आता हे सगळे सहन करण्यापलीकडे गेले आहे. मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा देत ममता बॅनर्जींसोबत जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-गोवा निवडणुकीसाठी शिवसेनेनेही दंड थोपटले; 25 मतदारसंघात भाजपाला देणार टक्कर
काँग्रेस पक्षाने आत्महत्या न करता वेगळा मार्ग धरावा-
राज्यात व देशात काँग्रेसला पूरक नेतृत्व नसल्यामुळे त्यांचे अनेक आमदार भाजपमध्ये आले. तर अनेक आमदार राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जात आहेत. यामुळे काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांनी आत्महत्या न करता वेगळा मार्ग धरावा, असा टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.
हेही वाचा-मनोहर पर्रिकरांचा वारसा पुत्र उत्पल चालविणार; आमदार बाबुश मोन्सरातांकडून भाजपला सूचक इशारा
लुझिनो फलेरो यांची राजकीय कारकीर्द
- १९७९ मध्ये पहिल्यांदा न्हावेलीतून आमदार म्हणून निवडून आले होते.
- १९७९ मध्ये न्हावेलीतून बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले होते.
- १९९१ मध्ये कामगार मंत्री म्हणून कार्यरत होते.
- १९९९ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
- २००३ पर्यंत सलग सहावेळा आमदार झाले आहेत.
- २००७ मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत राहिले आहेत.
- मेघालय , मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, कर्नाटक येथे स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम केले. सरकार बनविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.