ETV Bharat / bharat

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे २७ आणि २८ डिसेंबरला कतारच्या दौऱ्यावर - S. Jaishankar Qatar tour

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे २७ आणि २८ डिसेंबरदरम्यान कतार देशाच्या दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात जयशंकर यांची कतारचे उपपंतप्रधान शेख मोहम्मद बीन अब्दुल रहमान बीन जासीम अल-ठाणी आणि कतारचे विदेशमंत्री यांच्याशी बैठक होणार आहे.

S. Jaishankar Qatar tour
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
author img

By

Published : Dec 26, 2020, 11:02 PM IST

नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे २७ आणि २८ डिसेंबरदरम्यान कतार देशाच्या दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात जयशंकर यांची कतारचे उपपंतप्रधान शेख मोहम्मद बीन अब्दुल रहमान बीन जासीम अल-ठाणी आणि कतारचे विदेशमंत्री यांच्याशी बैठक होणार आहे.

हेही वाचा - झारखंडमध्ये सीआरपीएफ जवानाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर जयशंकर हे पहिल्यांदाच कतारला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान जयशंकर हे कतारच्या मंत्र्यांशी द्विपक्षीय विषयांवर चर्चा करतील. चर्चेचे मुद्दे हे दोन्ही देशांच्या परस्पर हिताचे असतील. त्याचबरोबर, कोविड संकटकाळी कतारमधील भारतीयांना केलेल्या मदतीबद्दल जयशंकर कतार देशाचे आभार मानतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.

दोन्ही देशांमध्ये १०.९५ अब्ज डॉलर्सचा व्यापार

गेल्या काही महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे आमीर शेख तमीम बीन हमदाद अल-ठाणी यांच्या बऱ्याचदा फोनवर चर्चा झाली आहे. कतार आणि भारतात मजबूत आर्थिक, सांस्कृतिक संबंध आहेत. कतारमध्ये ७ लाखापेक्षा अधिक भारतीय राहातात. तसेच दोन्ही देशांमध्ये १०.९५ अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. दोन्ही देश ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रातील आपले द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी वचनबद्ध आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.

हेही वाचा - आयकर विभागाकडून तीन कंपन्यांच्या विरोधात शोध मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.