हैदराबाद - हैदराबाद शहराला संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून (FAO) आणि आर्बर डे फाउंडेशन यांच्याकडून सलग दुसऱ्या वर्षी 'जगातील वृक्ष शहरे' ( Tree Citys of the World ) म्हणून गौरवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी (दि. 13 एप्रिल)रोजी ट्विट करून ही माहिती दिली आहे. "आर्बर डे फाउंडेशन आणि FAO -UN द्वारे हैदराबाद शहराला जगातील वृक्ष शहरांमध्ये सलग दुसऱ्या वर्षी ओळखले जाते ही अत्यंत अभिमानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी ट्विटरवरू दिली आहे.
वचनबद्धतेसाठी देशांना ओळखले गेले - हैदराबाद आणि मुंबई 21 देशांतील 136 इतर शहरांसोबत आहेत. युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि कॅनडा हे अनुक्रमे 37, 19 आणि 18 शहरांसह सर्वाधिक शहरे असलेले देश आहेत. निरोगी, लवचिक आणि आनंदी शहरे निर्माण करण्यासाठी शहरी जंगलांची वाढ आणि देखभाल करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी देशांना ओळखले गेले आहे.
समुदायाचा अभिमान वाढवतात - हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA)च्या मते, झाडे ऊर्जा, वादळ पाणी व्यवस्थापन आणि धूप नियंत्रणासाठी खर्च कमी करतात, मालमत्तेचे मूल्य 7-20 टक्क्यांपर्यंत वाढवतात, समुदाय सदस्यांमध्ये मजबूत संबंध निर्माण करतात आणि समुदायाचा अभिमान वाढवतात.
हवामान बदल कमी करणे - झाडांच्या इतर फायद्यांमध्ये अन्न आणि पोषण, नोकर्या निर्माण करणे आणि गरिबी दूर करणे, गंभीर हवामानाच्या घटनांशी समुदायातील लवचिकता वाढवणे, हवामान बदल कमी करणे आणि अनुकूलन करणे आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणे यांचा समावेश होतो.
हेही वाचा - Joe Biden Vs Putin : रशियाचे युद्ध हे 'नरसंहार! पुतीन युद्ध गुन्हेगार असल्याचा बायडेन यांचा घणाघात