नई दिल्ली - अनेक अप्रचलित इंग्रजी शब्दांद्वारे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणणारे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एका नव्या शब्दावरुन चर्चा सुरु झाली आहे. थरुर यांनी ट्विटरवर फ्लोकिनोकिनीहिलीपिलीफिकेशन हा शब्द वापरला. ज्याच्या उच्चारण आणि अर्थाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे.
चर्चेला उधाण
लोकसभा सदस्य थरूर यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामाराव यांच्याशी मैत्रीपूर्ण संभाषणादरम्यान हा शब्द वापरला. राव म्हणाले, की कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्या औषधांची नावे खूप अवघड आहेत ज्याचा उच्चार करणे सोपे नाही. त्याला उत्तर म्हणून थरूर म्हणाले, फ्लोकिनोकिनीहिलीपिलीफिकेशन. ऑक्सफोर्ड शब्दकोशानुसार या शब्दाचा अर्थ निरर्थक गोष्टींचा विचार करण्याची सवय, असा आहे. त्यांच्या या शब्दाच्या वापरामुळे अनेक ट्विटर वापरकर्त्यांमध्ये या शब्दाचा उच्चार आणि अर्थ काय असेल याबद्दल चर्चेला उधाण आले.

इंग्रजी भाषेतील आकर्षक शब्दसंग्रह
शशी थरूर हे इंग्रजी भाषेतील आकर्षक शब्दसंग्रह आणि अपवादात्मक शब्दसंग्रह म्हणून ओळखले जातात. थरूर यांना टॅग करीत केटी रामा राव यांनी लिहिले, की शशी थरूर या शब्दाच्या उच्चारणामागे नक्की काहीतरी भूमिका आहे, अशी मला शंका आहे. विशेष म्हणजे थरूर सोशल मीडियावर इंग्रजीचे असे शब्द वापरतात जे वापरकर्त्यांना समजत नाहीत. सन 2019 मध्ये, शशी थरूर मालदीवमध्ये सुट्टीवर गेले होते. तिथे चित्रे पोस्ट करुन त्यांनी इंग्रजी शब्द 'केरफफल' वापरला. या शब्दाचा अर्थ काय आहे हे वाचून वापरकर्तेदेखील गोंधळून गेले. बर्याच लोकांनी शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दकोश उघडले आणि शब्दाचा अर्थ शोधण्यास सुरवात केली. बरीच मेहनत घेतल्यानंतर वापरकर्त्यांना कळले की 'केरफफल' म्हणजे गोंधळ किंवा गडबड.