लखीमपूर आसाममधील लखीमपूर जिल्ह्यातील धाकुआखाना न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बलात्काराचा आरोपी पळून गेला होता. आरोपी गेरजाई राजू बरुआ अन्य दोन गुन्हेगारांनाही गुरुवारी सकाळी सार्वजनिकरित्या बेदम मारहाण करण्यात आली. खून दरोडा आणि बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या गेरजाईला सप्टेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या देखरेखीखाली आजारपणामुळे त्याला त्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जानेवारी महिन्यात गेरजाई लखीमपूर रुग्णालयातून पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याला आठवडाभरातच ताब्यात घेतले.
गेरजाईसह अन्य दोन आरोपी सोनटी दास आणि जतीन तामुली यांना 16 ऑगस्ट रोजी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी धाकुआखाना न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाच्या आवारातील सुरक्षेच्या अभावाचा फायदा घेत तीनही गुन्हेगार न्यायालयाच्या शौचालयाच्या खिडकीचे कुलूप तोडून फरार झाले.
त्यानंतर बुधवारी जतीन तामुली यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. गुरुवारी सकाळी लखीमपूरच्या काही लोकांनी गेरजाई पुलाखाली लपलेला दिसला. लोकांनी त्याला बेदम मारहाण करून ठार केले. नंतर त्या ठिकाणाहून मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा प्रियकरासह पत्नी गेली सौदी अरेबियात पळून पतीने 3 मुलांना विष पाजून केली आत्महत्या