सागर / भोपाळ - मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात राहतगढ धबधब्याच्या ठिकाणी सहलीला गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा - मध्य प्रदेशात पिकअप वाहनाचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू
सागर शहरातील इटवारी परिसरातील रहिवासी नासिर खान आपल्या कुटुंबासमवेत मंगळवारी रहाटगड भागात धबधब्याच्या ठिकाणी सहलीला गेले होता. कुटुंबातील सर्व सदस्य धबधब्याच्या पाण्यात आंघोळ करत होते. अचानक ते खोल पाण्यात गेल्यामुळे ही दुर्घटना घडली. येथील धबधब्याखाली असलेल्या कुंडात बुडून या सर्वांचा मृत्यू झाला. येथे सहा जण बुडाले होते. मात्र, यातील एका लहान मुलीला वाचवण्यात यश आले आहे. ही मुलगी सध्या गंभीररीत्या जखमी असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे.
मुख्यमंत्री चौहान यांनी सरकारी तरतुदींनुसार पीडित कुटुंबीयांना मदत-सहाय्य देण्याचे निर्देश सागर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर, मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थनाही केली आहे.
-
हम उन्हें वापस नहीं ला सकते, लेकिन दु:ख की इस घड़ी में शोकाकुल परिवार के साथ मैं और पूरा मध्यप्रदेश खड़ा है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
पीड़ित परिवार को प्रावधान अनुसार राहत राशि प्रदान की जायेगी।
">हम उन्हें वापस नहीं ला सकते, लेकिन दु:ख की इस घड़ी में शोकाकुल परिवार के साथ मैं और पूरा मध्यप्रदेश खड़ा है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 17, 2020
पीड़ित परिवार को प्रावधान अनुसार राहत राशि प्रदान की जायेगी।हम उन्हें वापस नहीं ला सकते, लेकिन दु:ख की इस घड़ी में शोकाकुल परिवार के साथ मैं और पूरा मध्यप्रदेश खड़ा है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 17, 2020
पीड़ित परिवार को प्रावधान अनुसार राहत राशि प्रदान की जायेगी।
हेही वाचा - मध्य प्रदेश : बैतूलमध्ये लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक पुलावरुन खाली कोसळला, 6 ठार