कोलकाता : पश्चिम बंगालच्या इस्ट वर्धमान जिल्ह्यात रविवारी एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करत, कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी भाजपाच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौहाटी गावामध्ये रविवारी दुपारी भाजपाची प्रचारयात्रा सुरू होती. भिष्मदेव या उमेदवाराचा प्रचार सुरू असताना, तृणमूल आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये काही वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढला, आणि कार्यकर्ते धक्काबुक्कीवर आले. मग मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला, ज्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या कार्यालयाची आणि कार्यकर्त्यांचीही तोडफोड केली.
घर लुटले, गाड्याही तोडल्या..
या सर्व गदारोळात आजूबाजूच्या काही घरांमध्येही 'कार्यकर्ते' शिरले. काही घरांमधून सोनं, आणि सुमारे दोन लाख रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. तसेच, घराबाहेर असणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. आता हे कार्यकर्ते नेमके कोणत्या पक्षाचे होते हे अद्याप समोर आलं नाही.
हेही वाचा : 'पंतप्रधान मोदी सिंडिकेट नंबर 1, तर अमित शाह सिंडिकेट नंबर 2'; ममता बॅनर्जी यांची टीका