बरेली (उत्तर प्रदेश) : कायद्यानुसार भेसळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी कडक शिक्षा देखील होऊ शकते. आता अशाच एका प्रकरणात न्यायालयाने आरोपींना चक्क जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षा : हे प्रकरण उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यातील आहे. येथे भेसळ करणाऱ्यांना न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली. येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार यादव यांनी बनावट देशी तूप बनवल्याप्रकरणी पाच आरोपींना दोषी ठरवले. या प्रकरणी निकाल देताना त्यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय सर्व दोषींना 50-50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. भेसळ करणाऱ्यांना आतापर्यंतची ही सर्वात मोठी शिक्षा मानली जात आहे.
पोलिसांनी 14 वर्षांपूर्वी टाकला होता छापा : विशेष म्हणजे, हे प्रकरण १४ वर्षांपूर्वीचे आहे. १५ ऑक्टोबर २००९ रोजी सुभाष नगर पोलिसांनी सर्वोदय नगरजवळील अनंत सिमेंट ट्रेडर्सच्या तळघरात छापा टाकला होता. या छाप्यात बनावट देशी तूप बनवणाऱ्या ५ जणांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून अॅल्युमिनियमच्या ड्रममधील बनावट देशी तूप, बनावट देशी तुपाचे सीलबंद पॅक, रिफाइंड तेल, देशी तुपात मिसळण्यासाठी ठेवलेले पदार्थ जप्त केले. भेसळ करणारे हे पदार्थ सुगंधासाठी बनावट तुपात मिसळले जात असत. येथून एकूण २६ क्विंटल बनावट देशी तूप जप्त करण्यात आले होते.
50 हजारांचा दंडही ठोठावला : या प्रकरणी ५ जणांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईदरम्यान दोनजण फरार झाले होते. कोर्टात या प्रकरणी १४ वर्षांपासून सुनावणी सुरू होती. न्यायालयात आठ साक्षीदार हजर करण्यात आले होते. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अरविंद कुमार यादव यांच्या न्यायालयाने या पाचही आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना ५० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Cyber Financial Fraud Exposed : सायबर फ्रॉड करून कंपनीच्या खात्यातील रक्कम स्वत:च्या खात्यात वळविण्यास भाग पाडले; दोघांना मध्य प्रदेशातून अटक
- Child Abduction : रेल्वे वेटिंग रूममधून बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक, अपहरणाचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले
- Shailaja Darade Arrest : परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना अटक; नोकरीचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक