पुद्दुचेरी : तेलंगणाच्या राज्यपाल आणि पुद्दुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सौन्दराराजन यांनी माशांचा समावेश शाकाहारी आहारात करण्याची मागणी केली आहे. यातून मच्छीमारांना फायदा होईल, असेही त्या म्हणाल्या.
'पश्चिम बंगालमध्ये मासे शाकाहारी आहेत' : तमिलिसाई म्हणाल्या की, देशाच्या बहुतांश भागांमध्ये मासे मांसाहारी मानले जातात. मात्र पश्चिम बंगालमध्ये मासे शाकाहारी मानतात. या राज्यातील लोक, मग ते उच्च समाजाचे असोत किंवा उपजातीचे असोत, कोणत्याही शुभकार्यात नेहमीच मासे खातात. इतर राज्यातील लोकांपेक्षा ते वेगळे दिसत असले तरी बंगालींना त्याची पर्वा नाही. त्यानंतर तमिलिसाई सौन्दराराजन यांनी माशांचा समावेश शाकाहारी आहाराच्या यादीत करावा अशी मागणी केली.
'मासे खाल्ले तर तरुण आणि निरोगी राहाल' : तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकार मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. जर तुम्ही मासे खाल्ले तर तुम्ही तरुण आणि निरोगी राहू शकता. म्हणूनच मला फिश ग्रेव्ही आवडते. पश्चिम बंगालमध्ये माशांना शाकाहारी म्हटल्याप्रमाणे इथेही जर माशांच्या आहाराला शाकाहारी म्हटले जाते, तर सर्वजण मासे खाण्यासाठी पुढे येतील. त्याचा फायदा मच्छिमारांना होईल.
मत्स्यव्यवसाय आणि मच्छिमार कल्याण विभागाचा समारंभ : पुद्दुचेरी येथे मत्स्यव्यवसाय आणि मच्छिमार कल्याण विभागाच्या वतीने कल्याणकारी योजना आणि किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. या समारंभात केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एल. मुरुगन, मुख्यमंत्री रंगासामी, नायब राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन विशेष निमंत्रित म्हणून सहभागी झाले होते.
जीडीपीमध्ये मासेमारीचे 1.07 टक्के योगदान : त्या पुढे म्हणाल्या की, डॉक्टर आणि वैज्ञानिक सांगतात की, जर तुम्ही भरपूर मासे खाल्ले तर तुम्ही निरोगी आणि रोगमुक्त राहू शकता. राज निवास येथे पश्चिम बंगाल दिन साजरा झाला तेव्हा मासे शिजवले जात होते. त्यांनी नमूद केले की, आम्ही मासे मांसाहारी मानत नाही, आम्ही त्याला शाकाहारी समजतो'. उल्लेखनीय म्हणजे, मासेमारीच्या माध्यमातून मच्छीमार देशाच्या अर्थव्यवस्थेत ठराविक प्रमाणात योगदान देतात. जीडीपीमध्ये मासेमारी व्यवसायाचे 1.07 टक्के योगदान आहे.
हेही वाचा :