ETV Bharat / bharat

First Omicron Death : चिंता वाढली! इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचा जगातील पहिला मृत्यू - इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन

नवी दिल्ली- ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगात ( First Omicron Death ) पहिला बळी गेला आहे. हा मृृत्यू झाल्याची माहिती इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ( British Prime Minister on Omicron Death In UK ) दिली आहे.

Omicron Death in UK
Omicron Death in UK
author img

By

Published : Dec 13, 2021, 6:13 PM IST

Updated : Dec 13, 2021, 6:18 PM IST

नवी दिल्ली- ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगात ( First Omicron Death ) पहिला बळी गेला आहे. हा मृृत्यू झाल्याची माहिती इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ( British Prime Minister on Omicron Death In UK ) दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron Variant) या नव्या व्हॅरिएन्टची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. या विषाणूविषयी WHO ने 26 नोव्हेंबर रोजी काही माहिती जारी केली. त्यानुसार या व्हॅरिएन्टला WHO ने व्हायरस ऑफ कन्सर्न(VOC) म्हणजेच काळजी करण्याजोगा विषाणू ठरविले आहे.

हेही वाचा-Omicron In Mumbai : दिलासादायक! मुंबईतील ओमायक्रॉनच्या ३ रुग्णांना डिस्चार्ज

24 नोव्हेंबर रोजी झाले निष्पन्न

कोरोनाचा 'B.1.1.529' हा नवीन प्रकार म्हणजेच व्हॅरिएन्ट दक्षिण आफ्रिकेत आढळून आल्याचे सर्वप्रथम 24 नोव्हेंबर 2021 रोजी निष्पन्न झाले. ज्या नमुन्यांमध्ये हा व्हॅरिएन्ट निष्पन्न झाला ते नमुने 9 नोव्हेंबर 2021 रोजी गोळा करण्यात आले होते.

हेही वाचा-Pune Omicron Cases : पुणेकरांना मोठा दिलासा... 7 पैकी 5 ओमायक्रॉनचे रुग्ण निगेटिव्ह

अनेक म्युटेशन्स आढळल्याने चिंता

या विषाणूत मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स म्हणजेत बदल झाल्याचे दिसून आले आहेत. यातील काही बदल हे चिंताजनक आहेत. इतर चिंताजनक व्हॅरिएन्टच्या तुलनेत या व्हॅरिएन्टच्या माध्यमातून रिइन्फेक्शनचा धोका वाढल्याचे प्राथमिक पुराव्यांतून दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जवळपास सर्वच प्रांतांमध्ये या व्हॅरिएन्टचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

हेही वाचा-Omicron in Maharashtra : अवघ्या साडेतीन वर्षांच्या बालकाला ओमायक्रॉनची लागण

महाराष्ट्रात अशी आहे स्थिती

जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron Cases ) आढळून येत आहेत. 12 डिसेंबरपासून राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी - चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे 17 रुग्ण आढळून आले आहेत. आज नागपूर येथे एक रुग्ण ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आल्याने राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 18 वर गेला आहे. एकूण रुग्णांपैकी 9 रुग्ण बरे झाल्याने (Omicron Patient Discharge) त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे, नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Last Updated : Dec 13, 2021, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.