ETV Bharat / bharat

G20 Summit In Srinagar : श्रीनगरमध्ये पहिली G20 शिखर परिषद सुरू, चित्रपट पर्यटनाला चालना देण्यावर चर्चा

author img

By

Published : May 22, 2023, 8:46 PM IST

श्रीनगरमध्ये सोमवारी G20 शिखर परिषद सुरू झाली. या दरम्यान येथे 'आर्थिक विकास आणि सांस्कृतिक जतनासाठी चित्रपट पर्यटन' या विषयावर एका साईड प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.

G20 Summit In Srinagar
श्रीनगरमध्ये G20 शिखर परिषद
श्रीनगरमध्ये G20 शिखर परिषद

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 'फिल्म टूरिझम फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड कल्चरल प्रिझर्व्हेशन' या विषयावरील पहिल्या G20 शिखर परिषदेला सोमवारी सुरुवात झाली. अनेक देशांचे प्रतिनिधी आणि अधिकारी या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी श्रीनगरला पोहचले आहे. यावेळस त्यांनी परिषदेला संबोधित करताना त्यांच्या काश्मीर आणि चित्रपटांच्या आठवणी सांगितल्या. G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी तरुण असताना काश्मीरमध्ये झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण करून दिली आणि काश्मीरमधील दृश्यांशिवाय बॉलीवूड चित्रपट कसा अपूर्ण आहे हे देखील सांगितले.

  • J&K | Actor Ram Charan arrives at Srinagar airport to attend the first side event on 'Film Tourism for Economic Growth and Cultural Preservation' of the 3rd #G20 Tourism Working Group meeting.

    (Pic Source: DIPR) pic.twitter.com/0lXOerfo4G

    — ANI (@ANI) May 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'काश्मीरमध्ये चित्रपट निर्मितीसाठी भरपूर वाव' : ते म्हणाले की, मी काश्मीरला भेट दिली तेव्हा काश्मीरच्या पहलगाममध्ये एका चित्रपटाचे शूटिंग पाहण्याचे भाग्य मला मिळाले. ते पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये चित्रपट निर्मितीसाठी भरपूर वाव आहे. काश्मीरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटांच्या शूटिंगसाठी काश्मीरपेक्षा चांगली जागा असू शकत नाही. आम्ही येथे चित्रपटांच्या शूटिंगमध्ये मदत करू.

  • #WATCH | Kashmir is that kind of a place, I have been coming here since 1986, my father shot extensively here in Gulmarg and Sonamarg. I've shot in this auditorium in 2016. This place has something magical, it is such a surreal feeling coming to Kashmir, it draws the attention of… pic.twitter.com/jtHyp9OdVr

'काश्मीरच्या व्यक्तींचे बॉलिवूडमध्ये मोठे योगदान' : भारताच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात जम्मू आणि काश्मीरमधील अभिनेते आणि दिग्दर्शकांचे बॉलिवूडमध्ये किती मोठे योगदान आहे हे सांगितले. आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करत ते म्हणाले की, केएल सहगल, जीवन, ओमप्रकाश, राज कुमार आणि रामानंद सागर यांनी काश्मीरमध्ये चित्रपट बनवण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा दिली आहे.

'श्रीनगरकडे चित्रपट निर्माते आकर्षित होतात' : ते पुढे म्हणाले की, चित्रपट निर्मितीमुळे विद्यार्थ्यांना पार्टटाईम नोकरीही मिळत आहे. या आधी पाकिस्तानच्या बाजूने संप पुकारला जात असे, पण आता काहीच होत नाही. आता परिस्थिती सुधारली असून याचे श्रेय आम्ही सर्वसामान्यांना देतो, असे ते म्हणाले. केंद्रीय पर्यटन मंत्री जीके रेड्डी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, श्रीनगर हे भारतातील सर्वात जुने आणि सुंदर शहर आहे. आपल्या अनोख्या सौंदर्यामुळे, शहराने गेल्या काही वर्षांत चित्रपट निर्मात्यांना आकर्षित केले आहे. संपूर्ण भारतात चित्रपट पर्यटन पुनरुज्जीवित करणे हा आमचा उद्देश आहे.

  • #WATCH | This G20 Tourism Working Group meeting will spread the message of peace, progress, and prosperity, with tourism being a key driver, particularly for culture and filmmaking. The essential aspect of this meeting will lead to greater and greater job creation in Kashmir.… pic.twitter.com/9FzGTVdWSo

'चित्रपट पर्यटन विकासासाठी प्रयत्न' : पाहुणे व प्रतिनिधींचे आभार व्यक्त करून ते म्हणाले की, पर्यटन विकासासाठी आम्ही सर्वसमावेशक कार्यक्रम करत आहोत. 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने आणि 'द एलिफंट व्हिस्कर्स' या लघुपटाने यंदाचा ऑस्कर जिंकला. चित्रपट पर्यटन हे केवळ रुपेरी पडद्यापुरते मर्यादित नसून ते आपली संस्कृती आणि स्थानिक कलागुणांना वाव देते, आणि हा आमचा अजेंडाही असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार ; अनेक घरे जाळली, कर्फ्यूच्या वेळेत वाढ
  2. Pak FM Bilawal visits PoK : पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची पीओकेला भेट.
  3. G20 Srinagar summit : G20 बैठकीसाठी मोठ्या संख्येने येणार प्रतिनिधी, 'ही' आहेत उद्दिष्टे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.