ETV Bharat / bharat

चेन्नईच्या प्राणीसंग्रहालयातील नऊ सिंहांना कोरोना; एका सिंहिणीचा मृत्यू

author img

By

Published : Jun 4, 2021, 4:52 PM IST

Updated : Jun 4, 2021, 5:20 PM IST

first animal death due to covid lioness in chennai lost her life
चेन्नईच्या प्राणीसंग्रहालयातील नऊ सिंहांना कोरोना; एका सिंहिणीचा मृत्यू

16:50 June 04

चेन्नई : कोरोना विषाणूचा प्राण्यांमध्येही प्रसार होतो हे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. मात्र, आता चेन्नईमध्ये प्राण्यांमधील कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. शहराच्या अरिग्नार अण्णा प्राणीसंग्रहालायतील एका सिंहिणीचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर, तेथीलच आणखी आठ सिंहांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

११ पैकी नऊ सिंह पॉझिटिव्ह..

२६ मे २०२१ला या प्राणीसंग्रहालयातील पाच सिंह आजारी असल्याचे समोर आले होते. त्यांच्यामध्ये भूक न लागणे आणि खोकला अशी लक्षणे दिसत होती. हे दिसताच प्राणीसंग्रहालयाती वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्यासोबतच, तामिळनाडू व्हेटर्नरी अँड अ‌ॅनिमल सायन्सेस युनिव्हर्सिटीचे (टीएएनयूव्हीएएस) एक पथकही प्राणीसंग्रहालयातील पथकाला मदतीसाठी आले होते. यानंतर याठिकाणी असलेल्या ११ सिंहांच्या रक्ताचे नमुने विद्यापीठात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तसेच, नाकातील स्वॅब आणि विष्ठेचे नमुने भोपाळमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी डिसिजेस (एनआयएचएसएडी) याठिकाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

खात्रीसाठी पुन्हा पाठवले नमुने..

यानंतर तीन जूनला सायंकाळी सहाच्या सुमारास संग्रहालयातील नीता नावाच्या सिंहिणीचा (वय -९) मृत्यू झाला. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती. दरम्यान, संग्रहालयातील ११ पैकी नऊ सिंहांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे. या सिंहांना खरोखरच कोरोनाची लागण झाली आहे का याची खात्री करण्यासाठी त्यांचे नमुने आता बरेलीमधील इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट, आणि हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी याठिकाणीदेखील पाठवण्यात आले आहेत.

प्रोटोकॉलनुसार उपचार सुरू..

यासोबतच, संग्रहालयातील पॉझिटिव्ह आलेल्या सर्व सिंहांवर वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे. तसेच, प्राण्यांमधील कोरोनावरील उपचारांसाठी दिलेल्या प्रोटोकॉल्सनुसार त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दिली. यापूर्वी हैदराबाद आणि जयपूरमधील सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

हेही वाचा : देशद्रोह कायद्याचे पुनर्विलोकन - अखेर किती वेळा?

Last Updated : Jun 4, 2021, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.