ETV Bharat / bharat

Fire on INS Vikramaditya : आयएनएस विक्रमादित्यला लागली आग, कुठलीही जीवितहानी नाही - ins vikramaditya news

भारताचा एकमेव विमानवाहू जहाज ( Fire on indian warship ins Vikramaditya ) आयएनएस विक्रमादित्यला बुधवारी आग लागली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ( Ins Vikramaditya fire ) नौदल मुख्यालयाने या घटनेची माहिती दिली आहे. आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश चौकशी मंडळाला ( Ins Vikramaditya news ) देण्यात आले आहेत.

warship
warship
author img

By

Published : Jul 21, 2022, 11:47 AM IST

नवी दिल्ली - भारताचा एकमेव विमानवाहू जहाज आयएनएस विक्रमादित्यला ( Fire on indian warship ins Vikramaditya ) बुधवारी आग लागली. कर्नाटकातील कारवार तळावर कार्यरत असताना या जहाजाला ( Ins Vikramaditya fire ) आग लागली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली. तसेच, युद्धनौकेवरील ( Ins Vikramaditya news ) सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Punjab CM Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीतील रुग्णालयात भरती, संसर्ग झाल्याची माहिती

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नौदल मुख्यालयाने या घटनेची माहिती दिली आहे. आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश चौकशी मंडळाला देण्यात आले आहेत, असे नौदलाने आपल्या निवेदनात सांगितले आहे. युद्धनौकेची दुरुस्ती केल्यानंतर तिच्या सागरी चाचण्या घेतल्या जात होत्या. समुद्रात चाचणीसाठी नियोजित उड्डाण दरम्यान, विक्रमादित्य जहाजावर आग लागल्याची घटना घडली, असे नौदलाने सांगितले.

जहाजावरील अग्निशमन यंत्रणा वापरून जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आले आहे. ही घटना संध्याकाळी घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी, एप्रिल 2019 मध्ये विमानवाहू नौकेला आग लागल्याने एका तरुण नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी मे महिन्यातही विक्रमादित्य या जहाजाला किरकोळ आग लागली होती.

भारतीय नौदल पुढील महिन्यात त्यांची दुसरी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत सेवेत दाखल करणार आहे. विक्रमादित्य ही एक सुधारित कीव-श्रेणी विमानवाहू युद्धनौका आहे जी भारताने 2013 मध्ये रशियाकडून खरेदी केली होती आणि त्यास महान सम्राट विक्रमादित्य यांचे नाव सन्मानार्थ देण्यात आले होते.

हेही वाचा - President Election Result : राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, मतमोजनीला 11 वाजता सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.