ETV Bharat / bharat

Fire At Hospital In Dhanbad : हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत डॉक्टर दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू - हॉस्पिटलला आग डॉक्टराचा मृत्यू

धनबादमधील हाजरा क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत डॉक्टर दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर डॉक्टर दाम्पत्य बराच वेळ मदतीसाठी आरडाओरड करत राहिले मात्र त्यांना वाचवता आले नाही.

Fire
आग
author img

By

Published : Jan 28, 2023, 10:53 AM IST

पाहा व्हिडिओ

धनबाद (झारखंड) : झारखंडच्या धनबाद येथील हाजरा क्लिनिकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत डॉक्टर दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बऱ्याच प्रयत्नांनंतर आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता आले.

डॉक्टर दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, विकास हजरा आणि प्रेमा हजरा यांचे निवासस्थानही हाजरा हॉस्पिटलमध्येच आहे. दोघेही हॉस्पिटलमध्येच राहत होते. रुग्णालय आणि दोघांचे निवासस्थान यांच्यामध्ये एक कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानापर्यंत जाण्यासाठी आहे. दोघेही याच कॉरिडॉरमधून हॉस्पिटलमध्ये येत असत. या कॉरिडॉरमध्ये आग लागली आहे. आगीमुळे धुराचे लोट उठू लागले आणि संपूर्ण कॉरिडॉर धुराने भरून गेला. हा धूर विकास हजारा आणि प्रेमा हजारा यांच्या घरापर्यंतही पोहोचला. कॉरिडॉर आणि त्यांचे निवासस्थान पूर्णपणे धुराने भरले होते आणि डॉक्टर दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाला.

पहाटे एक वाजता लागली आग : प्राथमिक माहितीनुसार ही आग पहाटे एक वाजण्याच्या सुमारास लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी बाधित लोकांना बाहेर काढले. घाईघाईत तेथून सुटका करण्यात आलेल्या सर्व लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आग लागली तेव्हा सर्वजण झोपले होते. त्यामुळे आगीची माहिती कोणालाच लागली नाही आणि आग वेगाने पसरली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

अपघातात सर्व रुग्ण सुखरूप : कॉरिडॉरमधून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. त्या ठिकाणी दरवाजा लावला होता. अचानक मोठा आवाज झाला, त्यानंतर हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे समजले. स्टोअरला आग लागल्याने ही आग सर्वत्र पसरल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यानंतर इतर नातेवाईकांव्यतिरिक्त त्यांचे कामगार देखील रुग्णालयात त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते, ज्यांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या अपघातात सर्व रुग्ण सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : Sienna Chopra Mount Kilimanjaro : कर्नालच्या 6 वर्षीय सिएनाने 17,000 फुटांवर फडकवला तिरंगा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.