विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील (एचपीसीएल) रिफायनरीला दुपारी भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सूरू आहे. तसेच येथील कर्मचाऱ्यांनीही सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
एक तृतीयांश ठिकाणी ज्वलनशील सामग्री -
विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील (एचपीसीएल) रिफायनरीमध्ये तीन युनिट्स असून क्रूड डिस्टिलेशन युनिटमध्ये ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या युनिटपैकी एक तृतीयांश ठिकाणी ज्वलनशील सामग्री असल्याचीही माहिती आहे.