बक्सर - देशात कोरोनाच कहर असून अनेक ठिकाणी रुग्णवाहिकांचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बिहारच्या बक्सरमध्ये त्याच-त्याच रुग्णवाहिकांचे चारदा उद्घाटन झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील बातम्या ईटीव्ही भारतने सातत्याने प्रकाशित केल्या. यावर ईटीव्ही भारतचे वार्ताहर उमेश पांडे यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही एफआयआर भाजपा नेते आणि बक्सर विधानसभेचे माजी उमेदवार परशुराम चतुर्वेदी यांनी दाखल केली.
उमेश पांडे यांच्यावर बक्सरच्या सदर पोलीस ठाण्यात 500, 506, 290, 420 आणि कलम 34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेते परशुराम चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे आणि भाजपाची प्रतिमा डागाळण्याचा आरोप उमेश पांडे यांच्यावर केला आहे.
14 मे 2021 रोजी ईटीव्ही भारतने बक्सरमधील एक बातमी प्रकाशित केली होती. 'जनतेची फसवणूक! 5 जुन्या रुग्णवाहिकांवर नवीन स्टिकर लावून दुसऱ्यांदा उद्घाटन करणार अश्विनी चौबे' असे त्या बातमीचे शीर्षक होते.
या बातमीनंतर राज्यात गोंधळ उडाला. तथापि, 15 मे 2021 रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सर्व रुग्णवाहिकांचे पुन्हा उद्घाटन केले. याप्रकरणी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी पांडे यांनी अधिक तपास केला असता, रुग्णवाहिकांचे दुसऱ्यांदा नाही, तर चौथ्यांदा उद्घाटन करण्यात आल्याचे समोर आले. 'रुग्णवाहिकांवर नवीन स्टिकर लावून रुग्णवाहिकांचे चौथ्यांदा उद्धघाटन' अशी बातमी प्रकाशित करण्यात आली. यावेळी अश्विन चौबे यांचीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केली. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही. रुग्णावाहिका उद्घाटन प्रकरणी त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
यातच या प्रकरणाने आणखी एक नवीन वळण घेतले. चार वेळेस उद्घाटन झालेल्या रुग्णवाहिकांची नोंदणीच झाली नसल्याचे समोर आले. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2020मध्येच बीएस-4 मॉडेल वाहनांच्या नोंदणीवर बंदी घातल्याचे बक्सर जिल्हा परिवहन अधिकारी मनोज रजक यांनी सांगितले. बक्सर जिल्हा परिवहन अधिकारी मनोज रजक यांच्या प्रतिक्रियेसह ईटीव्ही भारतने 22 मे 2021 लाही बातमी ठळकपणे प्रकाशित केली.
रुग्णवाहिकांची नोंदणीच झाली नसल्याची बातमी प्रकाशित झाल्याच्या दोन दिवसांनंतर 24 मे 2021 रोजी बक्सर जिल्हा परिवहन अधिकारी मनोज रजक यांनी घुमजाव घेत, वाहनांची नोंदणी सध्या करता येत नाही. कारण सॉफ्टवेअरमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. गाड्या अजूनही सुरू आहेत. आरोग्य विभाग स्तरावर बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर मार्गदर्शक सूचनांनुसार काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.
काय आहे रुग्णवाहिका वाद?
वास्तविक, ईटीव्ही भारतने सर्व पुराव्यांच्या आधारे 14 मे, 15 मे, 16 मे, 19 मे, 22 मे आणि 24 मे 2021 रोजी रुग्णवाहिका उद्धाटन आणि नोंदणीसंदर्भातील बातम्या प्रकाशित केल्या होत्या. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी उमेश पांडे यांनी या बातम्यांचे वार्तांकन केले होते. जुन्या रुग्णवाहिकांवर नवीन स्टिकर लावून रुग्णवाहिकांचे चारवेळेस उद्घाटन करण्यात आल्याचे उमेश पांडे यांनी सांगितले होते.
एकाच रुग्णवाहिकेचे 4 वेळा उद्घाटन -
- पहिले उद्घाटन - सदर रुग्णालयात 102 रुग्णवाहिका नावाने उद्घाटन
- दुसरी वेळ - किला मैदानात 'डॉक्टर आपल्या दारी' नावाने उद्घाटन
- तिसरी वेळ - कैमूरमधील रामगडमध्ये उद्घाटन
- चौथी वेळ - जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहातून 'महर्षी विश्वामित्र वाहन' च्या नावाने उद्घाटन
रुग्णवाहिका उद्घाटन वाद समोर आल्यानंतर राजकीय गोंधळ उडाला. विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव ते काँग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांना या विषयावर स्पष्टीकरण मागितले.
नेत्यांच्या प्रतिक्रिया...
- चौबे हे भाड्याने रुग्णवाहिका घेऊन उद्घाटन करतात. उद्घाटन झाल्यानंतर रुग्णवाहिका परत केल्या जातात. पुन्हा एका वर्षानंतर त्याच रुग्णवाहिकांचे उद्घाटन केले जाते, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी दिली.
-
ये महानुभाव केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री चौबे जी है। 1 दिन का किराया भुगतान कर मंत्री जी तमाम ऐंबुलंस को केवल उद्घाटन करने के लिए बक्सर लाते हैं, लेकिन उद्घाटन होने के साथ ही उनका मालिक उसे वापस लेकर चला जाता है। फिर एक साल बाद मंत्री उन्हें बुलाते है और फिर उद्घाटन करते है। pic.twitter.com/9ra6hLIizf
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) May 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ये महानुभाव केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री चौबे जी है। 1 दिन का किराया भुगतान कर मंत्री जी तमाम ऐंबुलंस को केवल उद्घाटन करने के लिए बक्सर लाते हैं, लेकिन उद्घाटन होने के साथ ही उनका मालिक उसे वापस लेकर चला जाता है। फिर एक साल बाद मंत्री उन्हें बुलाते है और फिर उद्घाटन करते है। pic.twitter.com/9ra6hLIizf
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) May 15, 2021ये महानुभाव केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री चौबे जी है। 1 दिन का किराया भुगतान कर मंत्री जी तमाम ऐंबुलंस को केवल उद्घाटन करने के लिए बक्सर लाते हैं, लेकिन उद्घाटन होने के साथ ही उनका मालिक उसे वापस लेकर चला जाता है। फिर एक साल बाद मंत्री उन्हें बुलाते है और फिर उद्घाटन करते है। pic.twitter.com/9ra6hLIizf
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) May 15, 2021
-
- कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंना अश्विनी कुमार चौबे जबाबदार आहेत. कारण, जेव्हा रुग्णवाहिका आवश्यक होती. तेव्हा त्यांनी धनुष फाऊंडेशनला जिल्ह्यातील 5 रुग्णवाहिका दिल्या आणि नागरिक आपल्या रुग्णांना खाद्यांवर घेऊन रुग्णालयात पोहोचले, अशी प्रतिक्रिया काँग्रेचे आमदार संजय तिवारी यांनी दिली.
- तेजस्वी यादव यांनी घरी बसून फक्त ट्विट करतात. आरजेडी आणि काँग्रेसचे नेते राजकारण करत आहेत. अश्विनी चौबे यांनी वैद्यकीय मोबाइल युनिट सेवा सुरू केली असून रुग्णवाहिकांचे उद्घाटन केले नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते परशुराम चतुर्वेदी यांनी दिली.
एफआयआरवर आरजेडीची प्रतिक्रिया -
आरजेडीने बक्सरमध्ये ईटीव्ही भारतच्या रिपोर्टरविरोधात एफआयआर नोंदविण्याचा तीव्र निषेध केला. ईटीव्ही भारतने आपली भूमिका पार पाडली आहे. पत्रकार नसते तर बक्सरमधील गंगेमध्ये वाहणाऱ्या प्रेतांना न्याय मिळाला नसता. सरकारने आपली चूक लपवण्यासाठी रिपोर्टरविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि जिथे आवश्यकता असेल तेथे आम्ही आमची भूमिका बजावू, अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दिली.