नवी दिल्ली- कोरोनाच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मात्र, कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या महिला डॉक्टरलाच नोकरी गमवावी लागली. नोकरी गमाविल्याच्या नैराश्यातून डॉक्टर महिलेने १४ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. ही घटना दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामधील बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. डॉ. प्रियंका चतुर्वेदी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
नोकरी गमाविल्यानंतर डॉक्टर महिला काही महिने घरी होती. अशातच नैराश्यावस्थेत महिला डॉक्टरने १४ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे.
हेही वाचा-अरेरेरे... सासरकडून जावयाला ही असली-कसली मारहाण
आत्महत्येच्या घटनेने सोसायटीत खळबळ-
ग्रेटर नोएडामध्ये बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौर सिटी-१ मध्ये डॉ. प्रियंका चतुर्वेदी राहत होत्या. त्यांनी इमारतीवरून उडी मारल्यानंतर सोसायटीत एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अनेक लोक जमले. पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर महिलेचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
बिसरख पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अनिता चौहान यांनी सांगितले, की घटनास्थळी कोणत्याही प्रकारची आत्महत्येची चिठ्ठी मिळाली नाही. डॉक्टर महिलेच्या आत्महत्येबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा-Video : दारुबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली विजय वडेट्टीवारांच्या फोटोची आरती