ETV Bharat / bharat

धक्कादायक CCTV VIDEO! अवघ्या 12 हजारांसाठी वडिलांनी मुलाला पेट्रोल टाकून जाळले - वडिलांना मुलावर पेट्रोल टाकून जाळले

वघ्या 12 हजार रुपयांसाठी वडिलांनी मुलावर पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला ( Father Poured Petrol on His Son ) आहे. चारमाजपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगरमध्ये ही घटना घडली.

Father Poured Petrol on His Son
Father Poured Petrol on His Son
author img

By

Published : Apr 7, 2022, 4:39 PM IST

Updated : Apr 7, 2022, 5:07 PM IST

बंगळुरू - शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 12 हजार रुपयांसाठी वडिलांनी मुलावर पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला ( Father Poured Petrol on His Son ) आहे. चारमाजपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगरमध्ये ही घटना घडली. यातील मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सुरेंद्र असे या वडिलांचे तर अर्पित असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मागील आठवड्यात अर्पितचे 12 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचाच राग मनात धरून वडिलांनी घरातच मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकले. त्यानंतर अर्पित घराबाहेर पडला. तो त्यांना विनवणी करत होता, मात्र, वडिलांनी काडी लावून अंगावर फेकली. आग लागल्यानंतर अर्पित परिसरात धावत होता.

वडील मुलावर पेट्रोल टाकतानाची घटना

स्थानिकांनी अर्पितची आग विझवली त्याला उपचारासाठी व्हिक्टोरिया शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत वडिल सुरेंद्रला ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी 22 एप्रिलपर्यंतची मुदत.. निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी देण्याचे राज्य सरकारला आदेश

Last Updated : Apr 7, 2022, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.