हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 16 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. येथे शिवशंकर आणि कोमल प्रसाद नावाच्या पिता-पुत्रांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 16.10 कोटी रुपयांची फसवणूक केली. ( father son cheating hyderabad ) ( cheating 16 crore hyderabad )
फसवणूक झालेलेही पिता-पुत्रच : योगायोगाने फसवणुकीचे बळीही पिता-पुत्रच आहेत. या प्रकरणी सुनील आहुजा आणि आशिष आहुजा यांनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रारी केल्या, त्यानंतर पोलिसांनी तपासात फसवणूक करणारे पिता-पुत्र असल्याचे उघड केले.
दोन्ही आरोपी पसार : आरोपी शिवशंकर याने दोन वर्षांपूर्वी शेखपेठेत व्यावसायिक इमारत बांधून आठ हजार चौरस फूट जागा देण्याच्या नावाखाली साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पीडित सुनीलने सांगितले. त्याचवेळी मुलगा आशिषने सांगितले की, कोमल प्रसादने कोंडापूरमधील एका व्यावसायिक इमारतीतील संपूर्ण तिसरा मजला नावावर करण्यासाठी 9.6 कोटी रुपयांची फसवणूक केली. तेव्हापासून दोन्ही आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा : इन्स्टंट कर्जाच्या देण्याच्या नावावर तरुणीची फसवणूक, कॉलगर्ल म्हणून फोटो वायरल करण्याची दिली धमकी