ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra: फारुख अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी, राहुल गांधींनी घेतली गळाभेट - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला मंगळवारी (३ जानेवारी) उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत सामील झाले. (Bharat Jodo Yatra) त्यांचा व्हिडिओ काँग्रेसने ट्विट केला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी फारुख अब्दुल्ला हे एकमेकांना गळेभेट घेतानादिसत आहेत. रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे (रॉ) माजी प्रमुख एएस दुलत हेही मंगळवारी यात्रेत सहभागी झाले होते.

Farooq Abdullah participates in India Jodo Yatra
फारुख अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी
author img

By

Published : Jan 3, 2023, 9:14 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आज भारत जोडो यात्रेमध्ये भाग घेतला. 'भारत जोडो यात्रा' आज मंगळवारी (दि. 3 जानेवारी)रोजी सकाळी दिल्लीहून उत्तर प्रदेशात पोहोचली, ज्यामध्ये राहुल गांधींसह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचा समावेश आहे. ही यात्रा दिल्लीतील कश्मिर गेटजवळील जमुना बाजार येथून सकाळी १० वाजता निघाली आणि दुपारी उत्तर प्रदेशातील लोणी (गाझियाबाद) येथे पोहोचली. (Farooq Abdullah participates in India Jodo Yatra) 'भारत जोडो यात्रा' 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि 24 डिसेंबर रोजी दिल्लीत पोहोचली. नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर आजपासून ती पुन्हा सुरू झाली असून, उत्तर प्रदेशनंतर ती हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये जाईल. दरम्यान, काँग्रेसने एक व्हिडिओ ट्विट करून लिहिले की, या प्रेम आणि आशीर्वादाने आम्ही आमचे ध्येय गाठू. देशाला जोडण्यासाठी आम्ही निघालो आहोत, देशाला एकत्र करून दाखवू असही यामध्ये म्हटले आहे.

  • यही प्यार और आशीर्वाद लिए अपने लक्ष्य तक जाएंगे...देश जोड़ने निकले हैं, देश जोड़कर दिखाएंगे।

    आज #BharatJodoYatra में शामिल हुए जम्मू-कश्मीर के पूर्व मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला जी। pic.twitter.com/tchUjKq360

    — Congress (@INCIndia) January 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कधी पोहोचणार कुठे? - काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सोमवारी (३ जानेवारी) सांगितले होते की, ही यात्रा उत्तर प्रदेशात ५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. 6 जानेवारीला भारत जोडो यात्रा हरियाणात दाखल होईल जिथे ती 10 जानेवारीपर्यंत राहील. (Farooq Abdullah Rahul Gandhi meets) यानंतर ही यात्रा 11 जानेवारीला पंजाबमध्ये प्रवेश करेल आणि 19 जानेवारीला हिमाचल प्रदेशातून एक दिवसासाठी जाईल. वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, 20 जानेवारीला ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 30 जानेवारीला राहुल गांधी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवतील आणि यात्रेची सांगता होईल.

'कोणीही विकत घेऊ शकत नाही' - काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी मंगळवारी त्यांचे मोठे बंधू राहुल गांधी आणि इतर भारत यात्रींचे भारत जोडो यात्रेसाठी उत्तर प्रदेशात प्रवेश करताना त्यांचे स्वागत केले. दरम्यान, आयोजीत स्वागत कार्यक्रमात प्रियंका बोलत होत्या. त्या म्हणाल्या राहुल यांनी सत्याचे चिलखत परिधान केले आहे, ज्यामुळे देव त्यांचे थंडीपासून आणि इतर सर्वांचे रक्षण करतो. दोन मोठ्या उद्योगपतींचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, राहुल गांधींना कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि ते सत्यापासून कधीही मागे हटणार नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.