ETV Bharat / bharat

Farmers strike suspend: 'शेतकरी विजय दिवस', सरकारच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांची 'घर वापसी'

केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर शेतकरी घरवापसी करत आहेत. आज शेतकरी आंदोलन (Farmers strike) मागे घेत असल्याची घोषणा करणार असून 11 डिसेंबर म्हणजे आज 'विजय दिवस' साजरा करणार आहेत. कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या पत्रानंतर आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. एका वर्षानंतर शेतकऱ्यांनी आपल्या घराची वाट धरत आहेत.

शेतकरी आंदोलन
Farmers strike suspend
author img

By

Published : Dec 11, 2021, 9:56 AM IST

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन ( Farmers Protest ) पुकारलं होतं. शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं. अखेर एक वर्षानंतर केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आणि शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर शेतकरी घरवापसी ( farmers agitation at Singhu on Delhi Haryana border ) करत आहेत. आज शेतकरी आंदोलन (Farmers strike) मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा शेतकरी करणार असून 11 डिसेंबर हा विजय दिवस साजरा करत आहेत. कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या पत्रानंतर आंदोलन स्थगित करण्यात येत असून एका वर्षानंतर शेतकऱ्यांनी आपल्या घराची वाट धरली आहे.

शेतकऱ्यांनी सिंघू, गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवरील महामार्गावर लावलेले अडथळे दूर केले असून तंबू हटवण्यात ( Farmers start removing tents ) येत आहेत. एमएसपी आणि इतर मागण्या पूर्ण करणार असल्याचे केंद्र सरकारने लिखित दिल्यानंतर आंदोलन संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी शेतकऱ्यांनी विजय मार्च काढत आंदोलनाला यश मिळाल्याबाबत आनंद व्यक्त केला.

कृषी आंदोलन सुरु झालं तेव्हा हजारोच्या संख्येने शेतकरी सिंघू, टिकरी सीमेवर आपल्या गाड्या आणि ट्रक्टरसह पोहचली होती. सीमेवरच त्यांनी आपला मुक्काम ठोकला होता. गेल्या एका वर्षात हरयाणा, उत्तर प्रदेश,पंजाब आणि इतर राज्यातील शेतकरी आंदोलन स्थळी एकत्र राहात होते. आंदोलन स्थळच त्यांचे घर झाले होते. आता आंदोलन मागे (Farmers Agitation suspend) घेतल्यानंतर वापस घरी परताना शेतकरी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या एका वर्षांपासून विविध राज्यातील शेतकरी एकत्र कुटुंबाप्रमाणे आंदोलन स्थळी राहत होते. धर्म, जातीला बाजूला ठेवत सर्वांनी सोबत केंद्राविरोधात आवाज उठवला होता. हे एक ऐतिहासिक आंदोलन होते, अशा भावना पंजाबच्या मोगा येथील शेतकरी कुलजीत सिंग यांनी व्यक्त केल्या. एक मोठे यश आणि चांगल्या आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही घरी परतत आहोत, असे उत्तर प्रदेशमधील जितेंद्र चौधरी यांनी म्हटलं. ऐतिहासिक आंदोलनाचा एक भाग व्हायला मिळालं. वेगवेगळे अनुभव यावेळी आले. तसेच गेल्या एका वर्षात अनेक नवे मित्र झाल्याचे चौधरी म्हणाले.

शेतकऱ्यांनी सरकारला दिलेली आश्वासन पूर्ण करण्याची मुदत 15 जानेवरीपर्यंत दिली आहे. येत्या 15 जानेवरीला पुन्हा शेतकरी नेते बैठक घेणार आहेत. आश्वासने पाळली नाही तर पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

आंदोलनादरम्यान 700 शेतकऱ्यांनी गमवाला जीव -

देशातील शेतकऱ्यांनी 26 नोव्हेंबर 2020 पासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Law) आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला एक वर्ष उलटले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीपुढे सरकारने झुकत कृषी कायदे रद्द ( Farm Laws Repealed) करण्याची घोषणा केली. गेल्या वर्षात आंदोलनादरम्यान तब्बल 700 शेतकऱ्यांचा ( Deaths in farmers agitation ) मृत्यू झाला आहे.

आंदोलनातील चर्चेचे विषय -

दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवर चालणारे शेतकरी आंदोलन ( Farmers Protest ) कमालीचे चर्चेत राहिले आहे. यामध्ये पोलिसांचा लाठीचार्ज, ट्रॅक्टर रॅली ( Tractor Rally ) आणि त्यानंतर झालेला हिंसाचार, हिंसाचारानंतर शेतकऱ्यांची माघारी वाटचाल, मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत ( Rakesh Tikait ) यांच्या अश्रूंनी शेतकरी आंदोलनाला पुन्हा दिलेली धार तसेच तरलखीमपूर खिरी घटना ( Lakhimpur Khiri Incident ) , या सर्व घटनांमुळे केंद्र सरकावर विरोधकांनी टीका केली होती.

हेही वाचा - Farmers Agitation suspend : 378 दिवसांचा संघर्ष मागे; दिल्ली-हरियाणा सीमेवरून शेतकऱ्यांकडून परतीची तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.