ETV Bharat / bharat

दिल्ली मार्च LIVE : आंदोलक शेतकऱ्यांची 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक

author img

By

Published : Dec 4, 2020, 8:52 AM IST

Updated : Dec 4, 2020, 5:55 PM IST

Farmer's Delhi Chalo protest LIVE Updates
कृषी कायद्यांविरोधात 'दिल्ली चलो'; नवव्या दिवशी आंदोलन सुरूच..

17:37 December 04

कृषी कायदे रद्द करणार की नाही? फक्त यावरच उद्या चर्चा - शेतकरी नेते

शेतकरी नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद

कृषी कायदे रद्द करावे ही आंध्रप्रदेश तेलंगणामधील शेतकऱ्यांचीही मागणी आहे. या राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. उद्या मोदी सरकार आणि मोठ्या व्यावसायिकांच्या प्रतिमा दहन करण्यात येणार आहेत. शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनीही आंदोलनात सहभागी करून घेणार आहोत. त्यासाठी सायकल रॅलीसह इतर कार्यक्रम करण्यात येत आहेत. ही लढाई संपूर्ण देशाची आहे. तोडा आणि फोडाचे राजकारण चालू देणार नाही. आम्ही मोठ्या विजयाकडे जात आहोत. यात सरकारची हार होत आहे. कायदा रद्द करणार की नाही, फक्त यावरच उद्या चर्चा होणार, असे शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   

17:30 December 04

आम्ही हे आंदोलन पुढे घेवून जाणार आहोत. सरकारला कायदे मागे घ्यावे लागतील - हनान मोलाह, महासचिव, ऑल इंडिया किसान सभा 

17:27 December 04

आंदोलक शेतकऱ्यांची पत्रकार परिषद...

दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काल सरकारशी चर्चा झाल्यानंतर आज शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. कृषी कायदे सरकारने रद्द करावे, असे आम्ही सरकारचा ठामपणे सांगितल्याचे शेतकरी नेते म्हणाले. ५ डिसेंबरला देशभरात पंतप्रधान मोदींची प्रतिमा दहन करणार आहोत. आठ डिसेंबरला भारत बंदची हाक दिल्याचे भारतीय किसान युनियनचे महासचिव एच. एस लखोवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषद घेत सांगितले.  

14:57 December 04

शेतकरी आंदोलनावरून विरोधी पक्षांचा सरकारवर दबाव

केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने सरकारवर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. सरकारने कायद्यांवर पुन्हा विचार करावा, अशी मागणी विरोधकांनी आधी केली होती. आता कायदा रद्द करावा अशी मागणीही विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले आहे.   

08:48 December 04

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुरस्कार वापसी..

पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. मोहनजीत, डॉ. जसविंर सिंग आणि पंजाबी ट्रिब्यूनचे संपादक स्वराजबीर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आपले पुरस्कार परत केले आहेत. यापूर्वी काल पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपला पद्मविभूषण पुरस्कार परत केला होता.

08:42 December 04

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पुढील रणनीती ठरवण्यासाठी शेतकरी संगठनांची सकाळी ११ वाजता एक बैठक होणार आहे.

गुरुवारी केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत शेतकरी नेत्यांच्या एका शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. मात्र, बैठक सकारात्मक झाली असून आणखी बरीच चर्चा राहिल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. किमान आधारभूत किमतींना हात लावू नये, ही एक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर सरकार मवाळ होत असल्याचेही नेत्यांनी सांगितले.

Last Updated : Dec 4, 2020, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.