नर्मदापुरम ( मध्यप्रदेश )- आई-वडिलांसोबत झालेल्या वादामुळे युट्युबर बिंधास काव्या संतापली आणि घरातून पळून Famous Youtuber Missing from Aurangabad गेली. एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस ट्रेनने ती इटारसीला Youtuber Found in Itarsi पोहोचली. पोलिसांनी रेल्वे स्थानकावर तिचा शोध घेतला असता ती ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये बसलेली आढळून आली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि जनतेची मदत मागितली होती. काल ती सापडली. त्यामुळे सर्वांनी सुटकेच श्वास घेतला.
ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये बसली होती - भोपाळ रेल्वेचे एसपी हितेश चौधरी म्हणाले की, "औरंगाबाद पोलिसांनी माहिती दिली की औरंगाबादहून बेपत्ता झालेली 16 वर्षीय यूट्यूब स्टार काव्या बहुधा कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बसली आहे. त्यानंतर इटारसी येथील ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये तपासणी केली तेव्हा ती तिथे Itarsi GRP rescue Youtuber Girl आढळली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणले गेले. काव्याच्या कुटुंबीयांना ती सापडल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर रात्री 12 वाजता आई-वडिल इटारसी येथे पोहोचले आणि तिला घेऊन गेले.
मूळ गाव यूपीमध्ये -औरंगाबादशिवाय लखनऊ हे तिचे मूळ गाव आहे. ते यूपीमध्ये आहे. तिने रागात लखनऊ ट्रेन पकडली. ट्रेन इटारसीला पोहोचताच जीआरपीने तिला ट्रेनमधून उतरवले.
पोलीस आणि मीडियाचे आभार - मुलीच्या पालकांनी औरंगाबाद पोलीस, इटारसी जीआरपी आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले आहेत. पोलीस आणि मीडियाच्या मदतीने काव्या मिळवल्याचे ते सांगतात. यूट्यूब स्टार गर्लचे जवळपास 45 लाख फॉलोअर्स 45 lakh followers on youtube आहेत. त्यांनी 2017 मध्ये त्यांचे यूट्यूब चॅनल सुरू केले. ते चॅनल अल्पावधीतच लोकप्रिय झाले.