नवी दिल्ली - महान टेनिसपटूंपैकी एक असलेल्या रॉजर फेडररने आज गुरुवार (दि. 15 सप्टेंबर)रोजी टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील आठवड्यात होणारी लेव्हर कप ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल. यानंतर फेडरर कोणत्याही स्पर्धेत किंवा ग्रँडस्लॅममध्ये सहभागी होणार नाही अशी घोषणा त्याने केली आहे. (Roger Federer Announced His Retirement) दरम्यान, फेडररने आपल्या चाहत्यांना एक पत्र लिहले आहे.
-
Tennis legend Roger Federer announces retirement, next week’s Laver Cup will be his final ATP event pic.twitter.com/FT6AAJ8TB9
— ANI (@ANI) September 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tennis legend Roger Federer announces retirement, next week’s Laver Cup will be his final ATP event pic.twitter.com/FT6AAJ8TB9
— ANI (@ANI) September 15, 2022Tennis legend Roger Federer announces retirement, next week’s Laver Cup will be his final ATP event pic.twitter.com/FT6AAJ8TB9
— ANI (@ANI) September 15, 2022
टेनिसला अलविदा - फेडररने आपल्या चाहत्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 24 वर्षांच्या कारकिर्दीत मी 1500 हून अधिक सामने खेळलो आहे. परंतु, यापुढे मी इतर कोणत्याही ग्रँडस्लॅम किंवा टूरमध्ये भाग घेणार नाही अस तो म्हणाला आहे. अलीकडेच टेनिस जगतातील आणखी एक महान खेळाडू सेरेना विल्यम्सनेही टेनिसला अलविदा केला होता.
इतकी महान खेळाडू हे होते - फेडररचे सध्या वय ४१ आहे. त्याने 41 वर्षानंतर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या त्याच्या कारकिर्दीत त्याने 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांची निवृत्ती ही टेनिस विश्वातील एका युगाचा अंत मानली जाऊ शकते इतकी महान खेळाडू हे होते अशी चर्चा सध्या सुरू आहे.
वर्धापन दिनानिमित्त - फेडररने जुलै 2021 मध्ये विम्बल्डननंतर कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलेला नाही. त्याला गुडघ्याच्या अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचे आश्चर्य वाटू शकत नाही. परंतु, या जुलैमध्ये ऑल इंग्लंड क्लबमध्ये सेंटर कोर्टच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो दिसला आणि म्हणाला की त्याला "आणखी एक वेळा" खेळण्यासाठी परत येण्याची आशा आहे. ऑक्टोबरमध्ये स्विस इनडोअरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत परतणार असल्याचेही त्याने सांगितले होते.
ती 8 महिन्यांची गरोदर होती - फेडररने त्याच्या आयुष्याती या यशात प्रत्येक मिनिटाला त्याच्या पाठीशी उभ्या असलेल्या पत्नी मिर्काचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, "फायनलपूर्वी तिने मला खूप प्रोत्साहन दिले, एक आधार दिला. दरम्यान, ती त्यावेळी ती 8 महिन्यांची गरोदर होती. मात्र, तरीही ती बरेच सामने कायम पाहत होती. सुमारे ती माझ्यासोबत 20 वर्षांहून अधिक काळ कायम खंबीरपणे उभी आहे असही तो म्हणाला आहे.
टेनिस न खेळण्याचा निर्णय - फेडररने त्याच्या सोशल मीडियावर दोन पानांची एक नोट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की आता तो 41 वर्षांचा आहे आणि त्याच्या शरीरालाही मर्यादा आहेत. सततच्या जखमा आणि ऑपरेशन्समुळे शरीर थकले आहे. राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांच्यानंतर सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा रॉजर फेडरर हा दुसरा खेळाडू आहे. फेडररने भावनिक चिठ्ठीत लिहिले की, “आपल्या 24 वर्षांच्या टेनिस कारकिर्दीत त्याने 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. आता व्यावसायिक करिअरला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. टेनिस खेळत राहील, पण आता ग्रँड स्लॅम आणि एटीपी टूर टेनिस न खेळण्याचा निर्णय घेतला आहे असही ते म्हणला आहे.
दुखापतीमुळे फेडररला यावर्षी एकाही ग्रँडस्लॅममध्ये भाग घेता आला नाही - रॉजर फेडररने 28 जानेवारी 2018 रोजी ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे शेवटचे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले. त्यानंतर विजेतेपदाच्या लढतीत त्याने क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला. त्यावेळी 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. मात्र, या वर्षाच्या शेवटी राफेल नदालने त्याचा विक्रम मोडला. त्या विजेतेपदानंतर फेडररवर वयाचा प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला आणि त्याचा फॉर्म घसरला. दुखापतीमुळे फेडररला यावर्षी एकाही ग्रँडस्लॅममध्ये भाग घेता आला नाही. फेडररने शेवटच्या वेळी 2021 फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला होता.
ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य - फेडरर हा ग्रास कोर्ट आणि हार्ड कोर्टचा सम्राट मानला जातो, पण लाल खडीवरील त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. असे असतानाही फेडररने एका प्रसंगी ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. फेडररने आपल्या कारकिर्दीत 8 विम्बल्डन, 6 ऑस्ट्रेलियन ओपन, पाच यूएस ओपन आणि एक फ्रेंच ओपन जिंकले आहेत. याशिवाय त्याने ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदकही जिंकले आहे.
सर्वाधिक पुरुष एकेरी ग्रँड स्लॅम
- राफेल नडाल (स्पेन)- 22 (ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-14, विम्बलडन-2, यूएस-4)
- नोवाक जोकोविच (सर्बिया )- 21 (ऑस्ट्रेलियन-9, फ्रेंच-2, विम्बलडन-7, यूएस-3)
- रोजर फेडरर (स्विट्जरलैंड)- 20 (ऑस्ट्रेलियन-6, फ्रेंच-1, विम्बलडन-8, यूएस-5)
- पीट सैम्प्रास (अमेरिका)-14 (ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-0, विम्बलडन-7, यूएस-5)