हैदराबाद- तेलंगाणातील मुलुगु जिल्ह्यात असलेले रामप्पा मंदिराचा समावेश नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. तेलंगाणामध्ये बर्याच ऐतिहासिक इमारती आणि किल्ले असले तरी रामप्पा मंदिराला जागतिक वारसा स्थानाचा दर्जा मिळणे ही एक मोठी बाब मानल्या जात आहे. हा अनोखा दर्जा मिळवण्याचा मार्ग सोपा नव्हता. या मंदिराचे वैशिष्ट्य संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले आणि वेगवेगळे धोरण अवलंबले. रामप्पा मंदिराला त्याची रचना, वास्तुकला आणि विशेष सामग्रीसह बांधकाम यासाठी जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे. जी अनेक दशकांपासून महत्त्वाची बाब ठरली आहे.
या मंदिराचे एकात्मिक भौगोलिक फायदे जसे, की एकाधिक बांधकाम आणि मंदिराच्या मुख्य संरचनेभोवती कोणतेही अतिक्रमण नसणे, ही बाब देखील हा दर्जा प्राप्त करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावले आहे. यापूर्वी गोळकोंडा किल्ला, चारमीनार आणि कुतुबशाही टॉम्ब्सच्या युनेस्कोच्या मान्यतेसाठी प्रयत्न केले गेले. राज्य सरकारकडून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) कडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत हे यशस्वी होवू शकले नाही. युनेस्कोच्या नियमांनुसार, जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी त्या इमारतीच्या 100 मीटरच्या आत इतर कोणतीही रचना असू नये. संरचनेच्या सभोवतालचे 200 मीटर परिघाचे क्षेत्र संरक्षित क्षेत्र असायला पाहिजे. तसेच, ही रचना अद्वितीय असली पाहिजे. जगातील कोणत्याही इतर इमारतीशी त्याचे साम्य जुळता कामा नये. या नियमांचे पालन न केल्यामुळे आणि अन्य समस्यांमुळे या स्थळांना अद्याप जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला नाही. सुरुवातीला युनेस्कोच्या नियमांचे पालन न केल्याने हजारो स्तंभ असलेला रामप्पा मंदिर आणि वारंगल किल्ला सुरुवातीला वगळ्यात आला होता. मात्र, रामप्पा मंदिराला आता युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
असा आहे रामप्पा मंदिराचा इतिहास
रामप्पा मंदिर 13 व्या शतकात आंध्र प्रदेशच्या काकातीय घराण्याचे महाराजा गणपती देव यांनी बांधले होते. त्यांनी आपल्या कारागीर रामप्पाला वर्षानुवर्षे टिकणारे मंदिर बांधायला सांगितले. असे मानले जाते, की मंदिराचे बांधकाम 1213 साली सुरू झाले आणि हे बांधकाम सुमारे 40 वर्षात पूर्ण झाले. रामप्पाने आपल्या कारागिरीना सांगत असे मंदिर तयार केले जे खूप सुंदर होते. त्याच कारागिराच्या नावाने राजाने या मंदिराचे नामकरण केले. या सौंदर्याने आज युनेस्कोच्या वारशामध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. रिचर्ला रुद्र हा ककट्या राजा गणपती देव यांचा सेनापती होता. त्याच्या देखरेखीखाली संपूर्ण बांधकाम काम झाले. भगवान शिव रामप्पा मंदिरात विराजमान आहेत, म्हणूनच याला रामलिंगेश्वर मंदिर देखील म्हटले जाते. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि मंदिरातील प्रमुख देवता रामलिंगेश्वर स्वामी आहेत.
रामप्पा मंदिराची वैशिष्ट्ये
13 व्या शतकात बांधलेले भगवान शिवचे हे मंदिर भारतीय शिल्पकलेचा एक अनोखा नमुना आहे. विशेष रचना आणि विशेष बांधकाम साहित्यामुळे रामप्पा मंदिर 800 वर्षांनंतरही आपल्या इतिहासाची साक्ष देत आहे.
तरंगत्या दगडांनी बनविलेले मंदिर
या प्राचीन मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते वाळूच्या खडकातून बनवल्या गेले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, रामप्पा मंदिरातील दगड अगदी हलके आहेत, जे पाण्यामध्ये तरंगतातही. पुरातत्वशास्त्रज्ञांचा चमू मंदिराच्या सामर्थ्याचे रहस्य शोधण्यासाठी संशोधन करत होते. जेव्हा त्यांनी मंदिराचा दगड फोडला, तेव्हा त्यांना आढळले की दगड वजनात फारच हलका आहे, जेव्हा त्यांनी दगडाचा तुकडा पाण्यात टाकला तेव्हा ते पाण्यात तरंगू लागले. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, रामप्पा मंदिराच्या दगडांचे वजन खूपच कमी आहे. म्हणून हे मंदिर अजूनही तटस्थपणे उभे आहे. रामप्पाने हे दगड कुठून आणले याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. सँडस्टोन आणि 6 फूट उंच व्यासपीठावर (सँडबॉक्स फाउंडेशन) बांधलेले हे मंदिर बीम आणि ग्रेनाइटद्वारे बनविलेल्या खांबांनी सुशोभित केलेले आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे मीनार किंवा विमान (क्षैतिज बुरुज- क्षैतिज पायर्या असलेल्या बुरुज), जे पिरॅमिडच्या आकारात आहे. व्हिमना सच्छिद्र विटांचा वापर करून बनविला गेला आहे, जो वजनात कमी आहे. काकातीय राज्यकर्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या विटा फ्लोटिंग विटा म्हणून ओळखल्या जातात.
शिल्प जिवंत दिसतात
रामप्पा मंदिरात बनवलेले शिल्प आश्चर्यकारक आहेत. जे कठोर डोलेराईट दगडाने तयार केलेले आहेत. हे असे दिसतात की ते जिवंत आहेत आणि आता चालू लागतील. तार्यांच्या आकारामुळे हे मंदिर त्रिकौटिल्य नावानेही प्रसिद्ध आहे. भगवान शिव, विष्णू आणि सूर्य देव या मंदिरात एकत्र बसले आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची एकत्र उपासना करण्याची परंपरा नाही, परंतु या मंदिरात ब्रह्माऐवजी सूर्य देव पूजेच्या रूपात स्थापित झाला आहे.