ETV Bharat / bharat

इस्तांबुलमध्ये भीषण स्फोट; एकाला अटक, तर 6 लोकांचा मृत्यू, 81 जखमी

तुर्कीतील (Turkkey) इस्तंबुल (Istanbul) काल (रविवारी) बॉम्बस्फोटांने हादरले आहे. या स्फोटात अनेकजण जखमी झाले आहेत. अशातच तुर्कीच्या इस्तंबुलमध्ये मोठ्या आत्मघातकी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ( police arrested person who left bomb in market turkkey )

Explosion Occurred
बॉम्बस्फोटातील संशयित अटक
author img

By

Published : Nov 14, 2022, 10:58 AM IST

तुर्की : तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये मोठ्या आत्मघातकी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अनाडोलू एजन्सीनुसार, गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सोमवारी (14 नोव्हेंबर) सांगितले की, इस्तंबूलमध्ये स्फोट करणारा बॉम्ब सोडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, रविवारी संध्याकाळी इस्तंबूलच्या मध्यभागी एका वर्दळीच्या भागात मोठा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून 81 जण जखमी झाले आहेत.( police arrested person who left bomb in market turkkey )

काही मिनिटांनी मोठा स्फोट झाला : हल्ल्यानंतर अल जझीराने सूत्रांचा हवाला देत आपल्या अहवालात दावा केला आहे की या हल्ल्यात तीन लोक सामील होते, त्यापैकी एक महिला आणि दोन तरुण आहेत. हल्ल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. यामध्ये एक संशयित महिला स्फोटाच्या ठिकाणी रस्त्यावर बॅग टाकून बाहेर येताना दिसली. काही मिनिटांनी मोठा स्फोट झाला. या बॅगेत बॉम्ब असल्याचे समजते. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑनलाइन पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत आणि नंतर एक मोठा आवाज झाला, वाटसरू वळून पळू लागले. इतर फुटेजमध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच परिसरातील दुकाने बंद करण्यात आली आहेत.

सहा जण ठार आणि ५३ जखमी : ब्रॉडकास्टर 'सीएनएन तुर्क' कडून मिळालेल्या माहितीनुसार, हा मार्ग गर्दीचा आहे, जो स्थानिक आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे अनेक दुकाने आणि रेस्टॉरंट आहेत. 2015 ते 2017 दरम्यान तुर्कीमध्ये अनेक स्फोट झाले होते, ज्यांचा संबंध इस्लामिक स्टेट आणि बेकायदेशीर कुर्दिश गटांशी आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन यांनी या स्फोटाला इस्तंबूलच्या मुख्य रस्त्यावरील हल्ला म्हटले असून यात सहा जण ठार आणि ५३ जखमी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.